Methi Ladoo Recipe Video : अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू; लहान मुलंही आवडीने खातील, बनवण्याची सोपी पद्धत

Last Updated:

Methi Ladu Recipe Video : अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. अशा पद्धतीने मेथीचे लाडू बनवले तर लहान मुलंही आवडीने खातील.

News18
News18
थंडी म्हटलं की मेथीचे लाडू आलेच. जे हिवाळ्यात फक्त आरोग्यासाठी फायदेशीर. पण मेथी म्हणजे कडू. त्यामुळे लहान मुलं काय मोठी माणसंही मेथीचे लाडू खायला बघत नाही. पण अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. अशा पद्धतीने मेथीचे लाडू बनवले तर लहान मुलंही आवडीने खातील.
पौष्टीक असे मेथीचे लाडू कडू होणार नाही अशी रेसिपी एका महिलेने युट्युब चॅनेलवर शेअर केली आहे. एकदा अशा पद्धतीने मेथीचे लाडू बनवून पाहा. आता यासाठी काय काय लागेल आणि कसं बनवायचं याची सविस्तर कृती पाहुयात.
गॅसवर कढई गरम करा. पाव कप किंवा  50 ग्रॅम मेथीचे दाणे घेऊन हलकी परतवून घ्या. मेथी गार झाली की मिक्सरमध्ये जाडसर पावडर करा. एका भांड्यात ही पावडर घ्या आणि त्यात तूप घाला. मेथीची पावडर बुडेल इतकं तूप घालायचं असेल. इथं 4-5 तूप घातलं आहे. तुपाऐवजी तेल किंवा दूधही घालू शकता. पण दुधात लाडू खराब होण्याची शक्यता असते. मेथी पावडर तुपात 3-4 दिवस, वेळ नसेल तर किमान 1 दिवस ठेवून त्या. मेथी अशी तुपात भिजवून ठेवली की ती कडू लागत नाही.
advertisement
आता गॅसवर एक कढई गरम करून त्यात तूप घ्या. तुपात 100 ग्रॅम खारीक (बिया, देठं काढलेले) कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्या आणि त्याची पावडर करून घ्या. आता कढईत पुन्हा तूप घ्या त्या अर्था कप किंवा 50 ग्रॅम बदाम घ्या आणि गरम करून परतवून घ्या. आता याच तुपात अर्धा कपापेक्षा थोडे कमी काजू परतवून घ्या. याच तुपात 3 कप मखाने म्हणजे 50 ग्रॅम मखाने तेलात भाजून घ्या.
advertisement
कढईत 3 कप किंवा 150 ग्रॅम सुकं खोबरं सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या. कढईत 2 मोठे चमते अळीव किंवा हलीम भाजून घ्या. अळीव तडतडले की लगेच काढून घ्या. यातही 2 मोठे चमचे खसखस भाजून घ्या, आता एक मोठा चमचा ओवा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
कढईत 4-5 मोठे चमचे साजूक तूप घाला. निम्म्या कपपेक्षा कमी किंवा 50 ग्रॅम डिंक घालून परतून घ्या. आता उरलेल्या तुपात आणखी तूप घ्या. गरम झालं की अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम गव्हाचं पीठ टाकून त्याचा रंग बदलेपर्यंत खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्या. लागल्यास मधे मधे तूप टाका.
advertisement
आता तुपात भिजवलेली मेथी पावडर यात टाका, मिश्रणात एकजीव करा. जास्त परतू नका नाहीतर कडवटपणा वाढेल. आता हे पीठ एका ताटात काढून गार करून घ्या. नंतर खारीक, काजू, बदामाची पावडर करून घ्या. डिंकही जाडसर दळून घ्या. सुकं खोबरंही किंचित वाटा. मखाना पावडर टाका. ओवा, खसखस, अळीव गार झाल्यानंतर यात टाका. एक चमचा भर वेलचीपूड, एक चमचा सूंठ पावडर आणि थोडा जायफळ किसून घाला.
advertisement
आता कढईत एक चमचा तूप घाला यात 400 ग्रॅम बारीक किसलेला किंवा चिरलेला गूळ घाता. गूळ वितळला की लाडूचं मिश्रण यात ओता आणि नीट मिक्स करून घ्या. थंड झालं की लाडू वळून घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Methi Ladoo Recipe Video : अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू; लहान मुलंही आवडीने खातील, बनवण्याची सोपी पद्धत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement