Pickle Recipe Video : खास थंडीचं नवरंग लोणचं; कैरी, लिंबू, मिरची लोणच्यापेक्षा हटके
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mix Veg Pickle Recipe Video : सामान्यपणे कैरी लोणचं म्हटलं की त्यात कैरी, लिंबू लोणचं म्हटलं की त्यात लिंबू.... पण नवरंग लोणचं हे कशाचं बनतं? त्यात काय टाकतात? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.
लोणचं म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. जेवणासोबत लोणचं असले की जेवणाची चव अधिकच वाढते. दोन घास जास्तही जातात. तसं लोणचं म्हटलं की कैरी, लिंबू, मिरची, करवंद यांचं लोणचं समोर येतं. हीच काही मोजकी लोणची सगळ्यांना माहिती. तुम्हीही खाल्लं असाल. पण या लोणच्यापेक्षा वेगळं असं लोणचं ज्याची रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे, ते म्हणजे नवरंग लोणचं.
नवरंग लोणचं... नाव वाचूनच नेमकं हे लोणचं कसलं असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सामान्यपणे कैरी लोणचं म्हटलं की त्यात कैरी, लिंबू लोणचं म्हटलं की त्यात लिंबू.... पण नवरंग लोणचं हे कशाचं बनतं? त्यात काय टाकतात? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.
advertisement
नवरंग लोणचं हे थंडीसाठी खास असं लोणचं आहे, एक प्रकारचं मिक्स व्हेज लोणचं. आता यासाठी काय काय साहित्य लागतं आणि त्याची कृती काय ते पाहुयात.
नवरंग लोणच्यासाठी साहित्य
शलगम - 150 ग्रॅम
फ्लॉवर - 200 ग्रॅम
मुळा 150 ग्रॅम
कारलं - 100 ग्रॅम
गाजर - 100 ग्रॅम
हळद - 150 ग्रॅम
advertisement
परसबी - 100 ग्रॅम
आलं - 100 ग्रॅम
हिरवी मिरची - 100 ग्रॅम
पिवळी मोहरी - 45 ग्रॅम
बडीशेप - 25 ग्रॅम
मेथी दाना - 2 टेबलस्पून
जिरं - 1 टिस्पून
मोहरीचं तेल - 1 कप
ओवा - 1 टिस्पून
हिंग - 1/2 टिस्पून
काळी मिरी - 1 टेबलस्पून
कलौंजी - 1 tsp
advertisement
मीठ - 3 टेबलस्पून
काळं मीठ - काला नमक - 1 टेबलस्पून
लाल मसाला - 1/4 कप
व्हिनेगर - 1/2 कप
नवरंग लोणचं कसं बनवायचं/ कृती
सलगम, फ्लॉवर, मुळा, कारलं, गाजर, हळद, फरसबी, आलं आणि हिरव्या मिरच्या या सर्व भाज्या कापून घ्या. एका भांड्यात या भाज्या राहतील इतकं पाणी घेऊन ते उकळून घ्या. पाण्याला उकळी आली की त्यात भाज्या टाकून आणखी 3 मिनिटं उकळवा. तोपर्यंत मिरच्या आणि हळद कापून घ्या. ३ मिनिटांनी लगेच भाज्या गाळून घ्या. एका ट्रेवर कापड ठेवा आणि त्यात भाज्या पंख्याखाली वाळवा. दीड तासांनी भाज्या तयार आहेत.
advertisement
आता आपण मसाला तयार करू. पिवळी मोहरी मध्यम आचेवर 1 मिनिट तेलाशिवाय अशीच भाजून घ्या. यानंतर बडीशेप, मेथीचे दाणे आणि जिरं एक किंवा दीड मिनिटे कोरडे भाजून घ्या. भाजलेली पिवळी मोहरी आणि इतर भाजलेले मसाले देखील बारीक वाटून घ्या.
advertisement
कढईत मोहरीचं तेल गरम करा. धूर येत असल्याचं दिसलं की गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. तेलात ओवा, हिंग, काळी मिरी, हळद घालून चांगलं मिसळा. तेलात भाज्या, कच्ची हळद, आलं आणि हिरव्या मिरच्या घाला. आता कलौंजी, मीठ, काळं मीठ, लाल मिरची घालून सर्वकाही चांगले मिसळा. पिवळी मोहरी, बडीशेप, जिरं आणि मेथीचे दाणे घालून मिसळून घ्या. शेवटी व्हिनेगर घाला आणि लोणचं तयार.
advertisement
view comments
Location :
Maharashtra
First Published :
November 22, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pickle Recipe Video : खास थंडीचं नवरंग लोणचं; कैरी, लिंबू, मिरची लोणच्यापेक्षा हटके


