TRENDING:

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 'हे' 5 उपाय आजपासूनच सुरू करा, डॉक्टर म्हणाले...

Last Updated:

Preventing Breast Cancer Recurrence : स्‍तनाचा कर्करोग सर्वात सामान्‍य व प्राणघातक कर्करोग आहे, ज्‍याचा भारतातील महिलांवर परिणाम होतो. यशस्वी उपचारानंतर देखील स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्याचा धोका प्रमुख चिंतेचा विषय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
स्‍तनाचा कर्करोग सर्वात सामान्‍य व प्राणघातक कर्करोग आहे, ज्‍याचा भारतातील महिलांवर परिणाम होतो. वाढती जागरूकता आणि वैद्यकीय प्रगतीमुळे भारतातील जवळपास ७६ टक्‍के स्तनाच्या कर्करोगाच्‍या केसेसचे आता सुरुवातीच्या टप्प्यात निदान होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग म्हणजे कर्करोगाची गाठ स्तनात किंवा जवळच्या लिम्फ नोड्समध्ये आढळते आणि शरीराच्या इतर भागात पसरलेली नसते. ते ०, १, २ किंवा ३ टप्‍प्‍यामधील असू शकते. पण यशस्वी उपचारानंतर देखील स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्याचा धोका प्रमुख चिंतेचा विषय आहे.
उल्लेख केलेली अनेक लक्षणे कर्करोगाव्यतिरिक्त इतर परिस्थितींमुळे होऊ शकतात, जसे की ॲसिड रिफ्लक्स, अल्सर किंवा संसर्ग. मात्र जर ते कायम राहिले किंवा बिघडले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लवकर तपासण्या केल्याने प्रभावी उपचारांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
उल्लेख केलेली अनेक लक्षणे कर्करोगाव्यतिरिक्त इतर परिस्थितींमुळे होऊ शकतात, जसे की ॲसिड रिफ्लक्स, अल्सर किंवा संसर्ग. मात्र जर ते कायम राहिले किंवा बिघडले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लवकर तपासण्या केल्याने प्रभावी उपचारांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
advertisement

स्वादाबरोबरच आरोग्यासाठीही पौष्टिक फळ, पचनाच्या तक्रारी करेल दूर

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अर्ली ब्रेस्ट कॅन्सर (ईबीसी)चे निदान झालेल्या जवळपास २० टक्‍के महिलांना १० वर्षांच्या आत पुन्‍हा स्‍तनाचा कर्करोग होण्‍याची शक्‍यता आहे. निदानाच्या वेळी वय, ट्यूमरचा आकार, कर्करोग असलेल्या लिम्फ नोड्सची संख्या, जनुकांमधील उत्परिवर्तन किंवा कर्करोग वाढण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या जनुकांची असामान्य क्रिया यांसह अनेक घटकांमुळे ईबीसी असलेल्या प्रत्येक महिलेला स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्याचा धोका वेगळा असतो. जोखीम समजून घेणे आणि पुढील उपाययोजनांबाबत स्‍पष्‍ट जाणीव असणे हे स्‍तनाचा कर्करोगामधून वाचलेल्यांना आत्मविश्वासाने जीवन जगण्‍यास मदत करण्‍यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

advertisement

केसांसाठीचं नैसर्गिक कंडिशनर, वापरा या खास टिप्स, केस दिसतील मुलायम

सुदैवाने, वैद्यकीय प्रगतीमुळे स्तनाच्या कर्करोगातून वाचलेल्यांसाठी दृष्टिकोन बदलत आहे. हार्मोन-आधारित उपचारांसह आरोग्‍यदायी उतींना वाचवून कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणारे अत्याधुनिक लक्ष्यित उपचार केले जात आहेत. तसेच, अल्पावधीत स्‍तनाचा कर्करोग नियंत्रित करण्याऐवजी दीर्घकाळापर्यंत स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याच्या शक्‍यतेला कमी करण्‍यावर, तसेच दीर्घकाळापर्यंत जीवनाचा दर्जा उत्तम राहण्‍यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. परिणामत: अधिकाधिक महिलांना दीर्घकाळापर्यंत उत्तमरित्‍या जीवन जगता येते.

advertisement

सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या संचालिका आणि ऑन्कोलॉजी रिसर्चच्या संचालिका डॉ. सेवंती लिमये म्हणाल्या, "सुरुवातीच्या टप्प्यावरील ब्रेस्‍ट कॅन्‍सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा सामान्य समज आहे. प्रत्यक्षात, लवकर निदान झाल्‍यानंतर देखील स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्याचा धोका कायम असतो, कधी-कधी ५० टक्‍क्‍यांपर्यंत शक्‍यता असू शकते. म्हणून, प्रत्येक रुग्णाने प्रगत थेरपी पर्यायांबद्दल सतत दक्ष राहणे आणि चर्चा करणे महत्त्वाचे आहे. तुमचा वैयक्तिक धोका समजून घेऊन आणि तुमच्या काळजी घेणाऱ्या टीमसोबत एकत्रित काम करून तुम्ही स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याची शक्यता कमी करण्यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी सक्रिय पावले उचलू शकता."

advertisement

शिळं अन्न खाताय ? ही माहिती आधी वाचा, जाणून घ्या प्रकृतीचा धोका

अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सर पुन्‍हा होण्‍याचा धोका कमी करण्‍यासाठी ५ उपाय पुढीलप्रमाणे

१. आरोग्‍यदायी वजन आणि सक्रिय शारीरिक जीवनशैली राखा-

शरीराचे जास्‍त वजन आणि निष्क्रिय शारीरिक जीवनशैलीमुळे स्तनाचा कर्करोग होण्‍याचा धोका वाढू शकतो. नियमित व्यायाम आणि आरोग्‍यदायी वजन राखणे यामुळे हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत होते, जळजळ कमी होते आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहते. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीन असलेल्‍या संतुलित आहाराचे सेवन केल्‍याने वजनाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होऊ शकते. हे सर्व घटक स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याची शक्‍यता कमी करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजातवत.

advertisement

२. नियमित फॉलो- अप घेत तपासणी करा-

स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याबाबत लवकर निदान केल्‍यास अधिक प्रभावी उपचार करता येऊ शकतात आणि उत्तम निष्‍पत्तींची खात्री मिळते. इमेजिंग, प्रयोगशाळेत चाचण्‍या व प्रत्‍यक्ष तपासणीसाठी फॉलो-अप वेळापत्रकाचे पालन केल्‍यास कोणतेही बदल लवकर ओळखण्‍यास मदत होते. तुम्हाला गाठी, वेदना किंवा अस्पष्ट थकवा यांसारखी कोणतीही नवीन लक्षणे दिसली तर विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

३. प्रगत उपचारांबद्दल डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या-

अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह निदान झालेल्‍या महिलांसाठी हार्मोन-आधारित औषधे आणि लक्ष्यित उपचारांसह प्रगत उपचारांमुळे जीवनाचा दर्जा कायम राखत स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका कमी होऊ शकतो. भारतात अजूनही केअर सर्विस उपलब्‍ध असण्‍याचे प्रमाण आणि जागरूकता वाढत आहे, ज्‍यामुळे फक्‍त जगण्‍याबाबत नाही तर जीवन जगण्‍याच्‍या पद्धतीबाबत देखील चर्चा होणे महत्त्वाचे आहे. यशस्‍वी उपचारासह दीर्घकाळापर्यंत काळजी, मानसिक आरोग्‍य व जीवनाचा दर्जा यांना देखील प्राधान्‍य दिले पाहिजे. रुग्णांना ‘माझ्यासाठी कोणते प्रगत उपचार पर्याय आहेत?' अशी प्रश्‍नं विचारण्‍यास प्रेरित केले पाहिजे.

४. मानसिक व भावनिक आरोग्‍य उत्तम राखण्‍याला प्राधान्‍य द्या-

भावनिक आरोग्‍य उत्तम असणे शारीरिक रिकव्‍हरी आणि दीर्घकाळापर्यंत जगण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. सामाजिक पाठिंबा, समुपदेशन व तणाव व्‍यवस्‍थापन यामुळे जीवनचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो, तसेच स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका देखील कमी होऊ शकतो. चिंता, नैराश्‍य किंवा स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याची भिती जाणवत असेल तर मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका.

५. तंबाखूचे सेवन टाळा आणि मद्यपान मर्यादित करा-

धूम्रपान आणि जास्त मद्यपान केल्याने स्तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका वाढू शकतो. तुम्ही धूम्रपान करत असाल तर समुपदेशन किंवा इतर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून धूम्रपान सोडण्‍यासाठी मदत घ्या. मद्यपान मर्यादित करा किंवा शक्य असल्यास पूर्णपणे टाळा. हे धोके कमी करण्याबाबत वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुमच्या केअर टीमसोबत याबाबत चर्चा करा.

भात खाऊनही वजन कमी करता येतं, फक्त 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा

स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका वास्तविक आहे, पण दक्षता, थेरपीचे पालन आणि आरोग्यासाठी व्यापक दृष्टिकोन यांद्वारे त्‍याचे व्‍यवस्‍थापन केले जाऊ शकते. तुमच्या केअर टीमसोबत सल्‍लामसलत करा, प्रगत उपचारांबद्दल चर्चा करा, जीवनशैलीच्या निवडींबाबत सक्रिय राहा आणि शारीरिक व मानसिक आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याला प्राधान्य द्या. अशी सक्रिय पावले उचलत तुम्‍ही स्‍तनाचा कर्करोग होण्‍याचा धोका कमी करू शकता आणि आरोग्‍यदायी जीवन जगू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 'हे' 5 उपाय आजपासूनच सुरू करा, डॉक्टर म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल