TRENDING:

Burner Unclogging Tips : गॅसचे बर्नर ब्लॉक झालेय? घरी बनवलेले हे द्रावण सहज करेल मोकळं, पाहा वापर..

Last Updated:

Gas Burner Unclogging And Cleaning Tips : अडकलेल्या बर्नर व्हेंट्समुळे गॅसची ज्वाला मंद होऊ शकते. मात्र तुम्हाला आता याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही एक सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय शेअर करणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपण रोज स्वयंपाकासाठी गॅस वापरतात. परिणामी बर्नरवर धूळ, घाण आणि तेल साचते. यामुळे बर्नरच्या व्हेंट्स अडकू शकतात आणि कधीकधी, गॅस पूर्ण पॉवरवर असतानाही ज्वाला जास्त नसते. वेळेवर योग्य स्वच्छता केल्यास ही समस्या सोडवली जाईल. अडकलेल्या बर्नर व्हेंट्समुळे गॅसची ज्वाला मंद होऊ शकते. मात्र तुम्हाला आता याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही एक सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय शेअर करणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही आणि काही मिनिटांत तुमचा गॅस बर्नर चमकेल.
गॅस बर्नर कसे स्वच्छ करावे
गॅस बर्नर कसे स्वच्छ करावे
advertisement

गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी लागणारे साहित्य..

- 2 ग्लास गरम पाणी

- लिंबाचा रस किंवा 1 चमचा व्हिनेगर

- अँटासिड पावडर (तुम्ही एनोदेखील वापरू शकता)

गॅस बर्नर स्वच्छ करण्याची पद्धत..

गरम पाणी तयार करा. एका भांड्यात 2 ग्लास गरम पाणी घाला. बर्नर बुडवण्याइतके पाणी गरम असावे. या पाण्यात लिंबाचा रस किंवा पांढरा व्हिनेगर घाला. लिंबाचा रस किंवा पांढरा व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळा. लिंबू किंवा व्हिनेगर चरबी कमी करण्यास मदत करते. आता या द्रावणात गॅस बर्नर बुडवा. नंतर संपूर्ण बर्नरवर एनो पावडर शिंपडा, ते सर्वत्र पसरवा. ते 10 मिनिटे तसेच ठेवा. दरम्यान एकदा बर्नर उलटा. द्रावण स्वतःच त्याचे काम करेल. 10 मिनिटांनी बर्नर काढा आणि ते स्वच्छ झाले आहे का ते पाहा. बर्नरमधील सर्व छिद्रे पूर्णपणे उघडतील आणि गॅसची ज्वाला अधिक उजळ होईल.

advertisement

गॅस बर्नर स्वच्छ करण्याची ही पद्धत केवळ सोपी नाही तर तुमचे पैसे देखील वाचवते. एनो पावडर आणि लिंबाचा रस किंवा व्हिनेगर यांचे मिश्रण बर्नरला चमकवते आणि हट्टी डाग आणि ग्रीस काढून टाकते.

गॅस बर्नर घाण होण्यापासून रोखण्यासाठी तो नियमितपणे स्वच्छ करा. बर्नर स्वच्छ केल्याने सर्व छिद्रे उघडी राहतात. यामुळे गॅस व्यवस्थित बाहेर पडतो आणि बर्नर पूर्णपणे काम करते. तसेच गॅस वायादेखील जात नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Burner Unclogging Tips : गॅसचे बर्नर ब्लॉक झालेय? घरी बनवलेले हे द्रावण सहज करेल मोकळं, पाहा वापर..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल