रशियन शास्त्रज्ञांच्या एका टिमने कर्करोगाची लस तयार केली आहे. फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने (FMBA) ही लस विकसित केली आहे. रशियाच्या कर्करोगाच्या लसीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशी घोषणा एफएमबीएच्या प्रमुख वेरोनिका स्कवोर्सोवा यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) इथं केली, असं रशियन वृत्तसंस्था TASS ने वृत्त दिलं आहे.
एफएमबीडीच्या प्रमुख वेरोनिका स्कवोर्सोवा म्हणाल्या की, या एमआरएनए- आधारित लशीने तिची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध करणाऱ्या सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत.
advertisement
Cancer : तुमच्या किचनमधील 3 भांडी ज्यामुळे होऊ शकतो कॅन्सर
प्रीक्लिनिकल चाचण्यांमधून वारंवार वापरल्यानंतरही लशीची सुरक्षितता आणि तिची प्रभावीता सिद्ध होते. संशोधकांनी या काळात ट्यूमरच्या आकारात घट आणि ट्यूमरच्या वाढीमध्ये घट झाल्याचं निरीक्षण केलं. याशिवाय लसीमुळे रुग्णांच्या जगण्याच्या दरात वाढ झाल्याचंही अभ्यासातून दिसून आलं.
रशियन एन्टरोमिक्स कर्करोग लस आता वापरासाठी तयार आहे. शास्त्रज्ञ आता मंजुरीची वाट पाहत आहेत स्कवोर्सोवा म्हणाल्या, ' हे संशोधन अनेक वर्षे चाललं, त्यातील शेवटची तीन वर्षे फक्त अनिवार्य प्रीक्लिनिकल अभ्यासांसाठी समर्पित होती. लस आता वापरासाठी तयार आहे. आम्ही अधिकृत मंजुरीची वाट पाहत आहोत.'
या लशीचं प्रारंभिक लक्ष्य कोलोरेक्टल कॅन्सर असेल, अशी माहिती मिळाली आहे.
कोलोरेक्टल कॅन्सरला कोलन कॅन्सरही म्हणतात. हा आतड्यांसंबंधी कर्करोग आहे.जो मोठ्या आतड्याला (कोलन) आणि गुदाशय प्रभावित करतो. हे तेव्हा घडते जेव्हा मोठ्या आतड्यातील असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि ट्यूमर बनवतात. हा ट्यूमर आसपासच्या ऊतींवर आक्रमण करू शकतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो. हा कॅन्सर तरुणांमध्ये जास्त दिसून येत आहे. धूम्रपानासारख्या काही सवयींमुळे त्याचा धोका वाढत आहे.
दरम्यान या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असल्या तरी लशीला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे ती कधी आणि कुठे उपलब्ध होईल ते आताच सांगता येत नाही.