चॉपिंग बोर्डवर रोज भाज्या, फळे किंवा मांसाहार कापल्याने त्यावर डाग, तेल आणि बॅक्टेरिया जमा होतात. जर हे व्यवस्थित साफ केले नाही, तर तेच बॅक्टेरिया खाण्यात मिसळतात, ज्यामुळे फूड पॉयजनिंग किंवा संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर याची सफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. आज माही तुम्हाला यासाठी एक सोपा उपाय सणगर आहोत.
advertisement
रोज अशी घ्या चॉपिंग बोर्डची काळजी..
- प्रत्येक वापरानंतर चॉपिंग बोर्डला हलक्या साबणाने आणि कोमट पाण्याने धुवा.
- एक मऊ स्पंज घ्या आणि बोर्डला हलक्या हातांनी घासून घ्या.
- डाग काढल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
- खास लक्ष ठेवा की बोर्डवर पाणी साचू नये, नाहीतर लाकडी बोर्डवर बुरशी लागू शकते.
लिंबू आणि मिठाने करा डीप क्लीनिंग..
- जर बोर्डवर हट्टी डाग किंवा काळ्या खुणा बनल्या असतील, तर रासायनिक क्लीनरची गरज नाही.
- बोर्डवर मीठ शिंपडा आणि त्यावर ताज्या लिंबाचा रस पिळा.
- लिंबाच्या सालीच्या मदतीने पृष्ठभागावर हळू हळू घासा.
- 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा आणि कोरडा करून घ्या.
- हा उपाय केवळ डागच नाही, तर दुर्गंधीही पूर्णपणे घालवतो.
दुर्गंधी मिटवण्याचा देसी उपाय..
अनेकदा कांदा, लसूण किंवा मासे कापल्यानंतर बोर्डवर तीव्र गंध राहतो. अशा वेळी लिंबूचा रस किंवा व्हिनेगर सर्वात प्रभावी उपाय आहे. थोड्या लिंबाचा रस बोर्डवर लावून ५ मिनिटे सोडा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी होईल.
बोर्ड दीर्घकाळ टिकाऊ कसे ठेवावे?
तुम्ही लाकडी चॉपिंग बोर्ड वापरत असाल, तर तो नेहमी कोरड्या जागी ठेवा. धुतल्यानंतर लगेच पाणी पुसून टाका. महिनाभरातून एकदा बोर्डला हलके नारळाचे तेल किंवा मिनरल ऑईलने चोळा. यामुळे लाकूड सुकणार नाही आणि बोर्ड जास्त काळ नवा राहील.
जिद्दी चिकटपणा काढण्याचा उपाय
बोर्डवर जुना थर किंवा चिकटपणा जमा झाला असेल, तर कोमट पाण्यात थोडा बेकिंग सोडा मिसळा आणि त्यामध्ये चॉपिंग बोर्ड ठेऊन ब्रशने घासा. यामुळे बोर्डचा पृष्ठभाग साफ होईल आणि त्यावर बॅक्टेरिया राहणार नाहीत.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.