TRENDING:

Vitamin B12 : व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी ही फळं अवश्य खा, गंभीर आजारांपासून दूर राहा

Last Updated:

व्हिटॅमिन बी 12 हे प्रामुख्यानं प्राणीजन्य पदार्थांमधून मिळतं, ज्यात दूध, मासे, अंडी आणि मांस यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. शाकाहारी असाल तर, व्हिटॅमिन बी 12 मिळवण्यासाठी, पाच फळं उपयुक्त ठरतात. या फळांमुळे, शरीरात व्हिटॅमिन बी 12 चं संतुलन राखणं शक्य होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 म्हणजे एक आवश्यक जीवनसत्व. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

दिवसभर थकवा, आळस किंवा अशक्तपणा यासारखी लक्षणं जाणवत असतील तर व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असण्याची शक्यता जास्त आहे. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन बी 12 हे प्रामुख्यानं प्राणीजन्य पदार्थांमधून मिळतं, ज्यात दूध, मासे, अंडी आणि मांस यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. शाकाहारी असाल तर, व्हिटॅमिन बी 12 मिळवण्यासाठी, पाच फळं उपयुक्त ठरतात. या फळांमुळे, शरीरात व्हिटॅमिन बी 12 चं संतुलन राखणं शक्य होतं.

advertisement

Breakfast : न्याहारी करणं का महत्त्वाचं ? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

फळं ही व्हिटॅमिन बी 12 ची प्राथमिक स्रोत नसली तरी, काही फळं शरीरात व्हिटॅमिन बी 12 चं पुरेसं प्रमाण राखण्यास मदत करतात.

सफरचंद - सफरचंद आपल्या शरीराला आजारांशी लढण्यास मदत करतं. हे फळ फायबर आणि जीवनसत्त्वांचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या शोषणात महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि लाल रक्तपेशींची कमतरता दूर होते.

advertisement

संत्र - संत्र्यांमुळे मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं मिळतात. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, आपल्या आरोग्यासाठी हे जीवनसत्त्व आवश्यक आहे. संत्र्यांमुळे शरीराला व्हिटॅमिन बी 12 चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते.

डाळिंब - डाळिंब हे शरीरासाठी खूप फायदेशीर फळ आहे आणि डॉक्टर कोणत्याही आजारातून बरे होताना डाळिंब खाण्याची शिफारस करतात. व्हिटॅमिन बी 12 चा प्राथमिक स्रोत नसला तरी, त्यात मुबलक प्रमाणात फायबर, जीवनसत्त्वं आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराचं रोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते.

advertisement

केळी - केळी हे आपल्या पचनासाठी एक महत्त्वाचं फळ आहे. त्यात फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, यामुळे आवश्यक पोषक घटक शरीरात पोचायला मदत होते.

पेरू - पेरू शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची पातळी राखण्यास मदत करतो. यात व्हिटॅमिन बी 12 खूप कमी प्रमाणात आढळतं, पण त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फॉलिक एसिड आणि पोटॅशियम असतं. यामुळे शरीरात आवश्यक पोषक घटक साठवण्यास मदत होते.

advertisement

Kidneys : मूत्रपिंडांचं आरोग्य तुमच्या हाती, मूत्रपिंडांचं काम व्यवस्थित राहण्यासाठी काय करावं ?

शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 चे फायदे -

व्हिटॅमिन बी 12 शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं, ज्यामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन राहतो, कारण लाल रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेतात.

शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असेल तर मेगालोब्लास्टिक एनिमियासारख्या समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन बी 12 मेंदू आणि मज्जासंस्था मजबूत करण्यास मदत करतं आणि त्यांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मका आणि कांद्याच्या दरात वाढ, सोयाबीनला काय मिळाला भाव?
सर्व पहा

हे मज्जातंतू पेशींवर मायलिन शीथ नावाचा एक संरक्षक थर तयार करण्यास मदत करतं आणि खाल्लेल्या अन्नाचं उर्जेत रूपांतर करण्याचं काम करतं, ज्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा येत नाही आणि ऊर्जा टिकून राहते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin B12 : व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी ही फळं अवश्य खा, गंभीर आजारांपासून दूर राहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल