कोरोनाच्या नवीन प्रकाराने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. दररोज डझनभर नवीन प्रकरणं समोर येत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणं सतत नोंदवली जात आहेत. नवीन संक्रमित लोकांची संख्या 1200 पेक्षा जास्त झाल्याने तज्ज्ञांच्या चिंताही वाढल्या आहेत. कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. कोविड-19 मुळे आतापर्यंत 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे त्याची तीव्रता आणखी वाढली आहे.
advertisement
JN.1 Variant: मुंबई ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईवर कोरोनाचं संकट, ही लक्षणं दिसली तर सावधान!
हे लक्षात घेता विविध राज्यांनी आरोग्य विभागांना सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य विभागाने रुग्णालयांना सतर्क राहण्यास आणि कोरोनाशी संबंधित वस्तूंचा जसं की औषधं, ऑक्सिजन सिलिंडर यांचा साठा ठेवण्यास आणि त्यांचं निरीक्षण करण्यास सांगितलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा रुद्रावतार
जानेवारी 2025 पासून एकूण 8282 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी 435 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारपर्यंत 106 रुग्ण बरे झाले आहेत, तर 325 रुग्ण अजूनही सक्रिय आहेत.
27 मे रोजी एकाच दिवसात राज्यात एकूण 66 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मुंबईत 31, पुण्यात 18, ठाण्यात 7, नवी मुंबईत 4, पनवेलमध्ये 3, सांगलीमध्ये 1 आणि नागपूरमध्ये 2 रुग्णांना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. आणि कोविडमुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आतापर्यंत 316 प्रकरणं
जानेवारीपासून मुंबईत एकूण 316 कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी सर्वाधिक 310 रुग्ण मे महिन्यात नोंदवले गेले. जानेवारीमध्ये 1, फेब्रुवारीमध्ये 1, मार्चमध्ये 0, एप्रिलमध्ये 4 आणि मेमध्ये 310 रुग्ण आढळले. आतापर्यंत आढळलेल्या सर्व कोविड रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणं खूप सारखीच आहेत. राज्य सरकारने कोविडच्या चाचण्या आणि उपचारांसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे.
Coronavirus in India : कोव्हिड लस घेतली तरी कोरोनोचा धोका आहे का?
केरळ बनलं हॉटस्पॉट
कोविड-19 च्या नवीन प्रकाराने संक्रमित झालेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत केरळ पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनत आहे. केरळमध्ये आतापर्यंत 400 हून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात अधिक खबरदारी घेतली जात आहे. याव्यतिरिक्त, चाचणी प्रक्रिया देखील वाढवण्यात आली आहे.