JN.1 Variant: मुंबई ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईवर कोरोनाचं संकट, ही लक्षणं दिसली तर सावधान!

Last Updated:

कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट नवी मुंबईत पसरत असून चार नवीन रुग्ण आढळले आहेत. हा ओमिक्रॉनचा उपप्रकार असून वेगाने पसरतो. लक्षणांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा यांचा समावेश आहे.

News18
News18
विश्वनाथ सावंत, मुंबई: ज्या कोरोना व्हायरसने जगभरात 2020-2021 मध्ये खळबळ उडवून दिली होती. त्याचा नवा व्हेरिएंट पुन्हा वेगाने पसरत आहे. चीन, सिंगापूरसह अनेक देशांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे रुग्ण दिसले आहेत. कोरोना भारतातही आला असून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता नवी मुंबईवरही हे संकट आलं आहे. हा व्हायरस झपाट्याने पसरण्याचे प्रमुख कारण म्हणजे नवीन JN.1 व्हेरिएंट आहे. हा ओमिक्रॉनचाच एक प्रकार आहे. या नव्या व्हायरसमध्ये वेगानं पसरण्याची क्षमता आहे. आधीपेक्षा या व्हायरसची लक्षणं खूप वेगळी आहेत.
नवी मुंबईत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असून, आज नवी मुंबईत चार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असून प्रशासनाकडून देखील दक्षता घेतली जात आहे.
advertisement
JN.1 प्रकार काय आहे?
JN.1 हा प्रत्यक्षात ओमिक्रॉन प्रकाराचा एक उपप्रकार आहे, जो BA.2.86 म्हणजेच पिरोलापासून विकसित झाला आहे. 2023 मध्ये लक्झेंबर्गमध्ये तो पहिल्यांदा ओळखला गेला आणि हळूहळू जगाच्या अनेक भागात पसरला, ज्यामध्ये आता भारताचाही समावेश आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की त्यात काही विशेष बदल झाले आहेत, ज्यामुळे हा प्रकार पूर्वीपेक्षा लोकांमध्ये वेगाने पसरतो.
advertisement
काय आहेत लक्षणं?
थंडी वाजून ताप येते
कोरडा खोकला
घसा खवखवणे
थकवा
डोकेदुखी
वाहणारे किंवा बंद झालेले नाक
स्नायू दुखणे
श्वास घेण्यास त्रास होणे
साधारण ही लक्षणं 14 दिवस राहतात. आतापर्यंत या आजाराचा एकही गंभीर रुग्ण आढळेला नाही ही सर्वात दिलासा देणारी गोष्ट आहे. पूर्वीच्या प्रकारांमध्ये जास्त ताप, घाम येणे आणि थंडी वाजून येणे सामान्य होते, JN.1 व्हेरिएंटमध्ये ताप हलका येतो, अंग कोमट राहातं, म्हणजेच शरीराचे तापमान 99.6°F ते 100.5°F दरम्यान राहते. त्याच्यासोबत थंडी वाजून येणे किंवा घाम येणे असे काही नसते. हा ताप अनेक दिवस अंगात राहातो थकवा किंवा सामान्य अशक्तपणा समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. ताप सर्दी खोकला झाल्यास तातडीनं डॉक्टरांकडे जावं. शिवाय रोज मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. ज्यामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
JN.1 Variant: मुंबई ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईवर कोरोनाचं संकट, ही लक्षणं दिसली तर सावधान!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement