गायीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की गायीच्या पोटात 33 कोटी देवांचा वास असतो. मग अशा पवित्र गायीच्या पोटातून निघणारं दूध हे सुद्धा पौष्टिकच असणार यात काही शंका नाही. एका अहवालानुसार, गायीच्या दुधात विविध पोषक तत्वं आढळून येतात. याशिवाय गायीच्या दुधात असे काही घटक असतात जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. जाणून घेऊयात डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी गायीचं दूध हे आरोग्याच्या दृष्टीने कसं फायद्याचं ठरतं ते.
advertisement
गायीच्या दुधाचे फायदे :
गाईच्या दुधाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो. म्हणजेच ते हळूहळू पचतं आणि त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी अचानक न वाढता स्थिर राहते ज्याचा फायदा मधुमेहाच्या रुग्णांना होतो. याशिवाय, गायीच्या दुधात नैसर्गिक प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. गायीच्या दुधात केसीन आणि व्हे प्रोटीन असते, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. हे प्रथिन रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढण्यापासून रोखते आणि शरीराला आवश्यक पोषण प्रदान करतं. याशिवाय गाईच्या दुधात निरोगी चरबी आणि चांगले कार्बोहायड्रेट्सने भरपूर प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचं प्रमाण सुधारण्यास मदत होते. याशिवाय गायीच्या दुधामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. गायीच्या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीराचा चयापचय दर सुधारून रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. याशिवाय, गायीचं दूध प्यायल्याने इन्सुलिन संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे शरीर चांगल्या साखर प्रकारे पचवू शकते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
गायीचे दूध पिण्याची योग्य पद्धत:
सकाळी रिकाम्या पोटी गायीचं दूध पिणं सर्वात फायदेशीर आहे. मधुमेह असलेल्या ग्णांनी फुल क्रीम दुधाऐवजी टोन्ड किंवा स्किम्ड दुधाचं सेवन करणं त्यांच्या फायद्याचं ठरतं. दुधात साखर, गुळ किंवा तत्सम गोड पदार्थाचं घालणं टाळावं. हळद, दालचिनी किंवा मेथीचे दाणे मिसळून गायीचं दूध प्यायल्याने या दुधाचे फायदे आणखी वाढतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्यानेही मधुमेह नियंत्रित राहण्यास होण्यास मदत होते.