महिला आणि मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता अधिक आढळते. डॉक्टरांच्या मते, नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, आहारात लोह, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 12 सारखे पोषक घटक असलेला आहार आवश्यक आहे.
Hair Care : कोरड्या केसांसाठी खास इलाज, घरी बनवता येईल असे हेअर पॅक
हिमोग्लोबिन पातळी सहज वाढवण्यासाठी, शाकाहारींसाठी, काही पदार्थांचे पर्याय पाहूयात.
advertisement
पालक - पालक ही सर्वात पौष्टिक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक आहे. त्यात लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. पालक खाल्ल्यानं शरीरात लाल रक्तपेशींचं उत्पादन वाढतं. भाजी, सूप, पराठा किंवा स्मूदीच्या स्वरूपात खाऊ शकता.
बीट - रक्त वाढवण्यासाठी बीटाची भाजी उपयुक्त आहे. बीटात नायट्रेट्स, फोलेट आणि लोह असतं, यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि लाल रक्तपेशींची संख्या वाढवण्यासाठी मदत होते. दररोज बीट खाल्ल्यानं हिमोग्लोबिनची पातळी लवकर सुधारू शकते. यासाठी बीटाची कोशिंबीर खाल्ल्यानं किंवा ज्यूस हे चांगले पर्याय आहेत.
डाळिंब - रक्त वाढवण्यासाठी डाळिंब चांगला नैसर्गिक स्रोत आहे. त्यात लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. डाळिंब खाल्ल्यानं किंवा त्याचा रस प्यायल्यानं अशक्तपणा कमी होतो आणि शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते.
मसूर आणि राजमा - शाकाहारींसाठी मसूर आणि राजमा हे प्रथिनं आणि लोहाचे उत्कृष्ट स्रोत आहेत. मसूर, मूग, चणे आणि राजमामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असतं, हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो.
दैनंदिन आहारात या फळ - भाज्यांचा समावेश केल्यानं अशक्तपणाशी लढण्यास मदत होते आणि फायबर आणि प्रथिनं देखील मिळतात.
Acid Reflux : अॅसिड रिफ्लक्स म्हणजे काय ? यावर कोणते उपचार करायचे ?
सुकामेवा - अशक्तपणाशी लढण्यासाठी मनुका, खजूर, अंजीर आणि बदाम यांसारखी सुकी फळं उत्कृष्ट मानली जातात. विशेषतः मनुका आणि खजूरमधील लोहाचं प्रमाण हिमोग्लोबिनची पातळी लवकर वाढवण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुका किंवा खजूर खाल्ल्यानं त्वरित ऊर्जा मिळते.
सफरचंद - सफरचंदांत लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रक्त शुद्ध होतं आणि लाल रक्तपेशींची संख्या वाढवायला मदत होते. सफरचंदाचा रस बनवणं आणि त्यात थोडे बीट घालून ते पिणं हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
