पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी परिसरात सध्या दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, चिखली रोडवरील मार्केटमध्ये कपड्यांवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स सुरू आहेत. या मार्केटमध्ये महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी सर्व प्रकारचे कपडे एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांकडून 40 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.
Diwali Decor Tips : दिवाळीची सजावट करताना 'या' चुका टाळा! बिघडवतील घराचे सौंदर्य आणि तुमचा मूडही..
advertisement
येथील मार्केटमध्ये टी-शर्ट फक्त 100 रुपयांपासून सुरू होत असून, विविध डिझाईन आणि विविध कलरमध्ये उपलब्ध आहेत. महिलांसाठी कुर्ती 150 ते 180 रुपयांपर्यंत मिळत आहेत. तसेच 1600 ते 1700 रुपयांचे ड्रेस फक्त 500 ते 600 रुपयांत विक्रीस ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कमी किमतीत दर्जेदार कपडे खरेदी करण्याची उत्तम संधी ग्राहकांना मिळत आहे. या आकर्षक सवलतींमुळे आकुर्डी मार्केटमध्ये दिवाळीपूर्वी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.