नाशिक मधील शालीमार परिसरात हा ए टू झेड (A to Z) गुरु नॉव्हेल्टीझ मॉल सुरू झाला आहे. या ठिकाणी घर संसारासाठी लागणाऱ्या एकूण एक वस्तू एका छताखाली उपलब्ध आहेत. तसेच दिवाळीसाठी विविध भेटवस्तू देखील इथं मिळतात. अगदी 10 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू खरेदीसाठी नाशिककर इथं गर्दी करत आहेत.
advertisement
Festive Saree Look : सणाला तुम्हीही दिसाल स्टायलिश आणि सुंदर! ट्राय करा साडीचे 'हे' अप्रतिम पर्याय..
बिझनेससाठी फायदा
ए टू झेड नॉव्हेल्टीझ येथे होलसेल दरात वस्तू खरेदी करून तुम्ही दिवाळीत स्वत:चा बिझनेस देखील सुरू करू शकता. अगदी 10 रुपयांपासून वस्तू घेऊन त्यातून चांगला नफा मिळवता येतो. विशेष म्हणजे खरेदीसाठी मुंबईला जाण्याची देखील गरज नाही. फक्त मागणी केल्यास थेट घरपोच सुविधाही यांच्याकडे उपलब्ध आहे, असे दुकानदार सांगतात.
काय आहे वस्तू?
घरात लागणाऱ्या सर्व वस्तू ग्लास, भांडी, वाट्या, ताट, स्वयंपाक घरातील एकूण एक वस्तू फक्त 10 रुपयांपासून उपलब्ध आहेत. तसेच 3 हजार रुपयांचा मिक्सर इथं फक्त 1100 रुपयांत मिळतोय. कामगारांसाठी टिफिन बॉक्स, घरातील भांडी सेट, बॉटल्स सेट, इस्त्री, क्रॉकरी, ज्वेलरी, कॉस्मेटिक अश्या सुद्धा वस्तू या ठिकाणी फक्त 20 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
दरम्यान, दिवाळीला स्वस्तातली खरेदी करण्यासाठी नाशिक मधील शालीमार परिसरातील सेंट थॉमस चर्च काम्प्लेक्स, शिवाजीनगर रोड या ठिकाणी A टू Z गुरु नॉव्हेल्टी या मॉलला भेट द्यावी लागणार आहे.