बौद्ध वास्तू शास्त्र, भिंती चित्रे आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने म्हणून या लेण्याकडे पाहिले जाते. अजिंठा येथे एकूण 30 लेण्या असून यामधील 26 व्या लेणी मध्ये प्रसिद्ध पुनर्निर्मित बुद्ध मूर्ती आहे. या लेण्या आणि इथले वातावरण एकदा तरी अनुभव घ्यावा असेच आहे. आज आम्ही तुम्हाला अजिंठ्यामध्ये कोणकोणत्या, किती लेण्या आहेत आणि तिथे कसं जावं याबद्दल माहिती देत आहोत.
advertisement
अजिंठा लेण्यांचा शोध ब्रिटीश सैन्य अधिकारी मेजर जॉन स्मिथ अजिंठाच्या जंगलात शिकारीसाठी गेले असता त्याला क्रमांक 10 लेणी नजरेस पडली. याचं दिवशी अजिंठा लेणी जगासमोर आली. अजिंठा व्ह्यू पॉइंट येथून त्यांना सर्वप्रथम लेण्या दिसल्या. जॉन स्मिथ यांची सही आणि वरील दिनांकाचा उल्लेख क्रमांक 10 लेणी मधील एका स्तंभांवर आढळतो.
अजिंठा लेण्यांमधील वास्तूकला भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण अजिंठा लेण्यांच्या भिंतींवर आणि छतावर कोरीव काम आणि चित्रांद्वारे वर्णन केलेले आहे. तुम्हाला जुन्या आणि भूतकाळातील लोकांच्या तेजाची आठवण करून देणाऱ्या अजिंठा येथे एकूण 30 लेण्या आहेत. अजिंठा लेणीमध्ये 24 बौद्ध विहार आणि 5 हिंदू मंदिरे आहेत. यामध्ये लेणी क्रमांक 26 मध्ये प्रसिद्ध पुनर्निर्मित बुद्ध मूर्ती आहे.
भारतीय प्रगत शिल्पकलेची साक्ष अजिंठा लेणीमध्ये पाहायला मिळते. या लेण्यांचे सौंदर्य, स्थापत्य आणि ऐतिहासिक वारसा हा पर्यटकांसोबतच अभ्यासकांनाही नेहमी भूरळ घालतो. त्यामुळे इथं नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनातील मानाचे पान असलेल्या अजिंठा लेणी प्रत्येकानं किमान एकदा तरी पाहयला हव्यात.
अजिंठ्यापर्यंत कसं जावं?
छत्रपति संभाजीनगरपासून 102 किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी ही लेणी आहे. तुम्ही पुण्यातून येणार असाल, तर 334 किलोमीटर अंतरावर असून 7 तास 47 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. मुंबईवरून येणार असाल तर 432 किलोमीटर अंतर असून साधारण 8 तास 50 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. अजिंठा लेणी बघण्यासाठी 40 रुपये तिकीट असून सकाळी 9 ते 5 या वेळेत तुम्ही भेट देऊ शकतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
