TRENDING:

Digestion : आतड्यांच्या स्वच्छतेसाठी आहारात करा सोपे बदल, सहज पचनासाठी उपयुक्त पर्याय

Last Updated:

आहारात काही बदल केले तर पचनाची समस्या खूप लवकर दूर होऊ शकते. पचनाचा, बद्धकोष्ठतेचा खूप त्रास होत असेल तर ही माहिती जरुर वाचा. आहारतज्ज्ञ लिमा महाजन यांनी इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमधे त्यांनी काही सोपे उपाय सांगितलेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पोट स्वच्छ असण्यावर दिनचर्या अवलंबून असते. पोट अस्वच्छ असेल तर दिवसभर चिडचीड होते, कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही.
News18
News18
advertisement

आहारात काही बदल केले तर पचनाची समस्या खूप लवकर दूर होऊ शकते. पचनाचा, बद्धकोष्ठतेचा खूप त्रास होत असेल तर ही माहिती जरुर वाचा. आहारतज्ज्ञ लिमा महाजन यांनी इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमधे त्यांनी काही सोपे उपाय सांगितलेत.

भिजवलेल्या काळ्या मनुका - बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काळ्या मनुका खूप फायदेशीर असतात. चार-पाच काळ्या मनुका पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा.

advertisement

Weight Loss : नवीन वर्षात करा वजन कमी, सकारात्मकता, सातत्य कायम ठेवा

मनुकांमधे भरपूर फायबर असतं आणि त्यात सॉर्बिटॉल नावाचा नैसर्गिक घटक असतो. आतड्यांमध्ये पाणी ओढण्यासाठी याची मदत होते. यामुळे मल मऊ होतो आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. काळ्या मनुका नियमित खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

कोमट पाण्यासोबत तूप - तूप आणि कोमट पाणी हा उपाय घराघरात वर्षानुवर्ष वापरला जातो आहे. पाण्यासोबत  तूप प्यायल्यानं पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. यासाठी, एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा शुद्ध तूप मिसळा आणि सकाळी प्या.

advertisement

Cholesterol : चेहऱ्यातले बदल सांगतात तब्येतीचे हालहवाल, जाणून घ्या सविस्तर

तूप आतड्यांसाठी नैसर्गिक वंगण म्हणून काम करतं, ज्यामुळे शरीरातून मल सहज निघून जातो. पचनसंस्था सक्रिय ठेवण्यासाठी कोमट पाणी मदत करतं. यामुळे, आतड्यांची हालचाल सुलभ होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ही संधी नका सोडू, थ्री पीस ड्रेस मिळतोय फक्त 500 रुपयांत, मुंबईत इथं करा खरेदी
सर्व पहा

किवी - किवी पचनासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पचनसंस्था निरोगी राखण्यासाठी दररोज एक ते दोन किवी खाऊ शकता. किवीमधे विरघळणारं फायबर असतं, यामुळे मल मऊ आणि जाड राहतो. यातल्या अ‍ॅक्टिनिडिन एंझाइममुळे पचन सुधारतं. पोट आणि आतड्यांमधून अन्न सहजतेनं जाण्यास मदत होते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion : आतड्यांच्या स्वच्छतेसाठी आहारात करा सोपे बदल, सहज पचनासाठी उपयुक्त पर्याय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल