स्नायूंची रिकव्हरी सुधारण्यासाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक म्हणजे व्यायामानंतरचे चांगले जेवण. व्यायामानंतरचे जेवण स्नायूंच्या रिकव्हरीसाठी खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीरासाठी योग्य पोषण केवळ जलद रिकव्हरीच देत नाही, तर दुसऱ्या दिवशी स्नायूंमधील वेदनाही कमी करते. स्नायूंच्या दुरुस्तीसाठी प्रोटीन हा सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे, हे जवळजवळ प्रत्येक फिटनेस उत्साही व्यक्तीला माहीत असते. प्रोटीन शेक आणि बारव्यतिरिक्त व्यायामानंतर काय खावे, हे तुम्हाला माहीत नसेल तर येथे काही पदार्थ दिले आहेत, जे रिकव्हरीमध्ये मदत करू शकतात.
advertisement
अंडी : अंडी प्रोटीनने समृद्ध असतात. त्यात भरपूर पोषक तत्वेही असतात, ज्यामुळे अंडी जलद स्नायूंच्या रिकव्हरीसाठी एक आदर्श अन्न आहे. अंड्यांमध्ये असलेल्या अमिनो ऍसिडमुळे स्नायूंच्या ऊतींची पुन्हा वाढ होण्यास मदत होते.
दुग्धजन्य पदार्थ : तीव्र व्यायामानंतर दूध आणि इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ स्नायूंच्या रिकव्हरीसाठी फायदेशीर आहेत. थंड दूध आरामदायक तर असतेच, याचबरोबर शरीराला ऊर्जा देखील देते. दुधामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असल्याने, ते स्नायूंच्या फाटलेल्या ऊतींना पुन्हा निर्माण करण्यास मदत करते.
पालक : शारीरिक श्रमानंतर ही पालेभाजी तुमच्या शरीराला ताजेतवाने करण्याची आणि ऊर्जा देण्याची क्षमता ठेवते. यात जास्त प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असल्याने, घामामुळे शरीरातून कमी झालेल्या पाण्याचा पुन्हा पुरवठा होण्यास मदत होते.
सुकामेवा : सुकामेवा मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स दोन्हीने समृद्ध असतो. तुम्ही वर्कआउटनंतर मूठभर बदामातून प्रोटीन, फायबर, आणि निरोगी चरबी मिळवू शकता. निवडण्यासाठी अनेक प्रकारचे सुकामेवा उपलब्ध आहे. वर्कआउटनंतर तुम्ही काही बिया मिसळून मूठभर मिश्रण खाऊ शकता.
पाणी : जेव्हा तुम्ही व्यायाम करता, तेव्हा घामावाटे पाणी शरीरातून बाहेर पडते. पुरेसे पाणी प्यायल्यास तुमचे शरीर अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते. याव्यतिरिक्त, ते रिकव्हरी आणि कार्यक्षमतेमध्येही मदत करते. त्यामुळे जिममध्ये जाताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.