रांची : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जेव्हा कोणी डायटवर म्हणजेच वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतं, तेव्हा त्यांच्या डोक्यात एक गोष्ट पक्की असते की, संध्याकाळी 7 वाजल्यानंतर जास्त काही खायचं नाहीये. शिवाय त्यापूर्वी केवळ हलके पदार्थ खायचे ज्याने वजन वाढणार नाही. कदाचित यामुळे वजन कमी होऊ शकतं परंतु भूकेने अक्षरश: कळवळायला होतं. खरंतर आजकाल अनेकजण फिट राहण्याला महत्त्व देतात. त्यामुळे आज आपण असे काही पदार्थ पाहूया जे खाल्ल्यावर वजनही वाढणार नाही आणि भूकही लागणार नाही.
advertisement
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या आयुर्वेदिक डॉक्टर वी के पांडे सांगतात, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत व्यक्तीने रात्रीचं जेवण करून घ्यावं. त्यामुळे वजन वाढत नाही. शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी आळसही येत नाही. संपूर्ण दिवस व्यक्ती ऊर्जावान राहते. तसंच रात्री खाऊन लगेच झोपून जाणं आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळे केवळ वजन वाढत नाही, तर शरिरातलं मेटाबॉलिज्मही स्लो होतं.
आरोग्यासाठी लाभदायी बीट; घरीच बनवा ‘या’ सोप्या पद्धतीनं लाडू रेसिपी
डिनरमध्ये खा 'हे' पदार्थ
त्याचबरोबर आपण डिनरमध्ये ओट्सची खिचडी खाऊ शकता. या खिचडीत फायबरचं प्रमाण अधिक आणि कॅलरीचं प्रमाण कमी असतं. मात्र लक्षात घ्या, आपल्याला केवळ एक वाटी ओट्स खायचे आहेत. आपण एक वाटी पोहेसुद्धा खाऊ शकता. यात कॅलरीचं प्रमाण कमी आणि प्रोटीन अधिक असतं. ज्यामुळे आपलं वजन वाढणार नाही. तसंच एक मल्टीग्रेन पोळी आणि हिरवी भाजीदेखील आपण खाऊ शकता. यामुळे आपल्याला मिनरल्ससह उच्च फायबरसुद्धा मिळेल. तसंच तुम्ही डिनरमध्ये व्हेज सलाड खाऊ शकता, ज्यात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. लक्षात घ्या, भाज्या व्यवस्थित शिजवा, मग त्यात हळद आणि मीठ घाला. याव्यतिरिक्त आपण व्हेज सूपदेखील पिऊ शकता. यामुळे आपलं पोट बराच वेळ भरलेलं राहील आणि आपल्याला भूकही लागणार नाही.
थकवा येतोय? तुरीच्या शेंगा करतील कमाल, हे फायदे माहितीयेत का?
'या' गोष्टी ठेवा लक्षात
डॉ. वीके पांडे सांगतात की, अनेकदा असं होतं आपण रात्रीच्या जेवणात केवळ पौष्टिक पदार्थ खातो किंवा सूप पितो परंतु आपलं वजन कमी होत नाही. याचं कारण आहे की, आपल्याला त्या पदार्थांचं नेमकं प्रमाण माहित नसतं. क्वांटिटी हा डायटमधला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g