डॉक्टर म्हणतात पाणी खाल्लं पाहिजे आणि चपाती प्यायला हवी. पाणी खायचं पण कसं आणि चपाती प्यायची पण कशी असा प्रश्न. डॉक्टरांनी हे सविस्तरपणे स्पष्ट करून सांगितलं आहे.
पाणी तुम्ही गटागटा पित असाल, जेवताना पित असाल, सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पित असाल तर पोटातील आग कशी टिकणार आहे, ती लागणारच नाही. मला तहान लागली याकडे आपलं लक्ष पाहिजे. घोट घोट पाणी प्या. भले तुम्ही एकदम दोन ग्लास पाणी प्या, पण ते पिताना एक घोट घ्या, तोंडात ठेवून त्यात लाळ मिसळू द्या. बॉडी टेम्प्रेचरला ते पाणी आणा आणि गिळा. पुन्हा दुसरा घ्या, तिसरा घोट घ्या. म्हणजे झालं पाणी खाणं.
advertisement
Health Risk Of The Day : सकाळी नाश्ता नाही केला तर काय होईल? ब्रेकफास्ट न करण्याचे दुष्परिणाम
दुसरा नियम म्हणजे चपाती प्या. कुठलाही घन पदार्थ, आपली आजी आपल्याला सांगायची की 32 वेळा चावून चावून खा. म्हणजे काय तर चपाती तोंडात इतकी चावली जायला हवी ती लिक्विड फॉर्ममध्ये यायला हवी. हे झालं आयुर्वेदाचं. मॉडर्न सायन्सप्रमाणे 65 टक्के पचन हे आपल्या लाळेमुळे होतं.
आयुर्वेदिक डॉ. सुयोग दांडेकर यांनी सौमित्र पोटे यांच्या #मित्रम्हणे पॉडकास्टवर ही माहिती दिली आहे.