साखर म्हटलं की सगळ्यात आधी कोणता आजार समोर येतो तर साहजिकच डायबेटिज. साखर मधुमेहाशी जोडली जाते. पण साखर आणि हार्ट अटॅकचा संबंध क्वचितच कुणाला माहिती असेल. साखर खाल्ल्यानेही हार्टवर परिणाम होऊ शकतो.
Heart Attack : 3 प्रकारचे असतात हार्ट अटॅक, कोणता असतो सगळ्यात खतरनाक?
जास्त साखरेचं सेवन केल्याने शरीरात दीर्घकाळ जळजळ होण्याची समस्या वाढू शकते. हे खराब झालेल्या धमन्यांचे मूळ कारण मानलं जाऊ शकते. साखरेचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन सोडावं लागतं. अशा परिस्थितीत कालांतराने हळूहळू चयापचय संतुलन बिघडू लागतं. यामुळे हे इन्सुलिन प्रतिरोधकता येऊ शकते. ही स्थिती मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
advertisement
ओन्ली माय हेल्थवर दिलेल्या माहितीनुसार याव्यतिरिक्त जास्त साखर आतड्यात चरबीचं उत्पादन वाढवतं, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि धमन्यांचा कडकपणा वाढतो. यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा मार्ग मोकळा होतो, ज्यामध्ये प्लाक जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
Heart Attack : चमत्कारिक पाणी, सकाळी रिकाम्या पोटी प्यायलात तर हार्ट अटॅकचा धोका कमी होईल
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठीने याची पडताळणी केलेली नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)