Heart Attack : 3 प्रकारचे असतात हार्ट अटॅक, कोणता असतो सगळ्यात खतरनाक?

Last Updated:

Heart Attack Types : वैद्यकीय परिभाषेत हृदयविकाराच्या झटक्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन असं म्हणतात. हृदयविकाराच्या झटक्याचे प्रामुख्यानं तीन प्रकार आहेत. ते कोणते ते पाहुयात.

News18
News18
मुंबई : हार्ट अटॅक अर्थात हृदयविकाराचा झटका हे शब्द नुसते ऐकले तरी भीती वाटते. कारण वेळेत उपचार न मिळाल्यास हार्ट अटॅक जीवघेणा ठरू शकतो. वैद्यकीय परिभाषेत हृदयविकाराच्या झटक्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन (Myocardial Infarction) असं म्हणतात. हृदयविकाराच्या झटक्याचे प्रामुख्यानं तीन प्रकार आहेत. ते कोणते ते पाहुयात.
हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता साधारणपणे झटका आल्यावर हृदयाच्या किती स्नायूंना दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. हृदयातल्या एखाद्या भागाला होणाऱ्या रक्तप्रवाहात रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळे निर्माण होतात, तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीज चरबी, कोलेस्टेरॉल किंवा अन्य पदार्थांमुळे घट्ट होतात. याला प्लाक असंही म्हणतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
advertisement
हृदयविकाराच्या झटक्याच्या तीन प्रकारांमध्ये एसटी सेगमेंट एलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन, नॉन एसटी सेगमेंट इलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन, कोरोनरी स्पाझम किंवा अनस्टेबल अंजायना यांचा समावेश होतो.
एसटी सेगमेंट एलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन (STEMI) : एसटी सेगमेंट एलेव्हेशन मायोकार्डिअल इन्फार्क्शन हा हृदयविकाराचा गंभीर प्रकार आहे. या प्रकारात कोरोनरी आर्टरी पूर्णतः ब्लॉक होते आणि त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. एसटी सेगमेंट एलेव्हेशन म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्रामवर दिसणारा पॅटर्न.
advertisement
या प्रकारचा हृदयविकाराचा झटका आल्यास संबंधित रुग्णाला तात्काळ आणि आपत्कालीन रिव्हॅस्क्युलरायझेशनची गरज असते. यामुळे धमनीमधून रक्त प्रवाह पुन्हा सुरू होतो. रिव्हॅस्क्युलरायझेशन थ्रॉम्बोलाइटिक्सच्या (क्लॉट बस्टर्स) औषधांद्वारे केलं जातं. यात इंट्राव्हेन्सद्वारे शरीरात औषधं सोडली जातात. तसंच अँजिओप्लास्टी करून कॅथेटर धमन्यांमध्ये टाकला जातो.
`एसटीईएमआय`मध्ये रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी वेदना होतात. काही रुग्णांना दोन्ही हातांना, पाठीत किंवा जबड्यामध्ये वेदना होतात. याशिवाय या प्रकारचा हृदयविकाराचा झटका आल्यास मळमळ, श्वास घेण्यास त्रास होणं, भीती वाटणं, डोकं हलकं वाटणं, शरीर थंड पडल्यासारखं वाटणं ही लक्षणं दिसून येतात. अशी लक्षणं दिसून आल्यास तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे.
advertisement
नॉन एसटी सेगमेंट एलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन (NSTEMI) : हृदयविकाराच्या झटक्याच्या एनएसटीएमआय या प्रकारात कोरोनरी आर्टरी अंशतः प्रभावित होते. ही स्थिती एसटीएमआयच्या तुलनेत कमी धोकायदायक असते.
एनएसटीएमआयमध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्रामवर एसटी सेगमेंट एलेव्हशनमध्ये बदल झाल्याचं दिसून येत नाही. या प्रकारात हृदयाचं कमी प्रमाणात नुकसान होतं. कोरोनरी अॅंजिओग्राफीत आर्टरी किती प्रमाणात ब्लॉक झाली आहे. हे दिसून येतं. तसंच संबंधित रुग्णाची रक्त तपासणी केली असता त्यात ट्रोपोनिन या प्रोटीनची पातळी वाढल्याचं दिसून येतं. या प्रकारात हृदयाचं कमी प्रमाणात नुकसान होत असलं, तरी ही एक प्रकारची गंभीर स्थिती मानली जाते.
advertisement
कोरोनरी स्पाझम किंवा अनस्टेबल अंजायना : कोरोनरी आर्टरी स्पाझम किंवा कोरोनरी स्पाझम हा हृदयविकाराच्या झटक्याचा एक प्रकार असतो. याला अनस्टेबल अंजायना किंवा सायलेंट हार्ट अॅटॅक असंही म्हणतात.
या प्रकारात एसटी सेगमेंट एलेव्हेशनप्रमाणेच लक्षणं दिसून येतात. स्नायू दुखणं, अपचन आदी प्रकारचा त्रास रुग्णाला जाणवतो. जेव्हा हृदयाची एक आर्टरी इतकी घट्ट होते की त्यातला रक्तप्रवाह थांबतो किंवा लक्षणीय प्रमाणात कमी होतो.
advertisement
इमेजिंग किंवा रक्त तपासणीतूनच याचं निदान होतं. या प्रकारामुळे हृदयाचं कायमस्वरूपी नुकसान होत नाही. हृदयविकाराचा हा सौम्य झटका फारसा गंभीर नसला तरी त्यामुळे पुन्हा झटका येण्याची आणि रुग्णाची स्थिती गंभीर होण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : 3 प्रकारचे असतात हार्ट अटॅक, कोणता असतो सगळ्यात खतरनाक?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement