जास्त वेळ बसणं, स्नायू कमकुवत होणं, चुकीच्या सवयी आणि शरीरात जाणवणारा ताठरपणा अशा विविध कारणांमुळे गुडघेदुखीचा त्रास वाढतो. काहीवेळा वेदना तीव्र असतात तेव्हा चालणं देखील कठीण होतं.
गुडघेदुखी केवळ गुडघ्यांमुळेच होत नाही तर मांड्या आणि कंबरेतील कमकुवत स्नायू, रक्ताभिसरण बिघडणं आणि शरीरात कडकपणा यामुळे देखील होते. योगासनं आणि काही सोप्या सवयींमुळे या वेदनांपासून आराम मिळू शकतो.
advertisement
Diet Tips : ओव्हरईटिंगचे दुष्परिणाम वाचा, आपोआप कमी होईल खाण्याचं प्रमाण
हालचाली करत राहा - हलक्या आणि सुरक्षित योगासनांनी सुरुवात करा. पाय एकत्र करून, गुडघे थोडे पुढे वाकवा आणि तळवे गुडघ्यांवर ठेवा. आता, या स्थितीत, गुडघे आधी वर्तुळाकार फिरवा, प्रथम घड्याळाच्या दिशेनं आणि नंतर घड्याळाच्या उलट दिशेनं फिरवा. यानंतर, गुडघे वाकवून सरळ करण्याचा सराव करा. यामुळे सांध्यातील हालचाल वाढते आणि गुडघ्यांमधला कडकपणा कमी होतो.
स्नायूंची बळकटी - स्नायू मजबूत करण्यासाठी, जमिनीवर सरळ बसा, मांड्या आत खेचा आणि हळूहळू मोकळ्या करा. तसंच, एका वेळी एक पाय वाकवून सरळ करण्याचा सराव केल्यानं देखील मदत होते. या सोप्या योगासनांनी गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे वेदना हळूहळू कमी होतात.
व्यायामांव्यतिरिक्त या गोष्टीही लक्षात ठेवा -
योगासनांसोबतच, जीवनशैली आणि सवयींमधे काही बदल करणंही महत्त्वाचं आहे.
गुडघे टेकून जास्त वेळ बसणं टाळा.
दर तीस-चाळीस मिनिटांनी थोडं चालत जा.
Kidney : हिवाळ्यात जपा किडन्यांचं आरोग्य, आरोग्यदायी पेयांचे पर्याय
सराव करताना, शरीराला वेदना होणार नाहीत याची काळजी घ्या.
वजन जास्त असल्यानंही गुडघेदुखी होऊ शकते. यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं खूप महत्वाचं आहे. जास्त वजनामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव पडतो.
चांगल्या कुशनिंगसह योग्य पादत्राणं घाला, कारण यामुळे गुडघ्यांवरचा ताण कमी होतो.
या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर, नैसर्गिकरित्या गुडघेदुखीपासून आराम मिळवू शकाल, पण वेदना असह्य असतील तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
