TRENDING:

Fatty Liver : फॅटी लिव्हर टाळण्यासाठी या उपायांचा विचार करा, या पौष्टिक भाज्यांमुळे मिळेल यकृताला आराम

Last Updated:

फॅटी लिव्हर ही समस्या वाढत चालली आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींतले बदल या समस्येला कारणीभूत ठरत आहेत. यकृताच्या पेशी जास्त चरबी साठवू लागतात तेव्हा फॅटी लिव्हर होतं. पण, वेळेवर उपचार आणि जीवनशैलीत बदल करून फॅटी लिव्हरवर सहज उपचार करता येतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आहार सगळ्यात महत्त्वाचा असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल तरुणांमधे फॅटी लिव्हरची समस्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळे यकृताचं कार्य बिघडतं आणि त्यावर उपचार केले नाहीतर लिव्हर सिरोसिस देखील होऊ शकतो. हे टाळण्यासाठी, काही भाज्या फॅटी लिव्हरपासून आराम मिळविण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
News18
News18
advertisement

फॅटी लिव्हर ही समस्या वाढत चालली आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींतले बदल या समस्येला कारणीभूत ठरत आहेत. यकृताच्या पेशी जास्त चरबी साठवू लागतात तेव्हा फॅटी लिव्हर होतं. पण, वेळेवर उपचार आणि जीवनशैलीत बदल करून फॅटी लिव्हरवर सहज उपचार करता येतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आहार सगळ्यात महत्त्वाचा असतो.

Vitamin B12: या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, अनेक गंभीर समस्यांना वेळीच घाला आळा

advertisement

आहारात काही भाज्यांचा समावेश केल्यानं, फॅटी लिव्हरची समस्या कमी होऊ शकते.

लसूण - लसणातील अ‍ॅलिसिन आणि सेलेनियम सारखे घटक यकृताला विषमुक्त करण्यास मदत करतात. यामुळे यकृतात जमा होणारी अतिरिक्त चरबी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. नियमितपणे लसूण खाल्ल्यानं फॅटी लिव्हरपासून आराम मिळतो असं अनेक अभ्यासातून आढळून आलं आहे.

पालक - हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी वरदान आहेत आणि पालक हा एक उत्तम पर्याय आहे. पालकात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. त्यातील ग्लूटाथिओन यकृताला विषमुक्त करण्यास मदत करतं. याव्यतिरिक्त, पालकातील नायट्रेट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि यकृताच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

advertisement

ब्रोकोली - ब्रोकोली ही एक क्रूसीफेरस भाजी आहे. यकृताच्या आरोग्यासाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्यातील ग्लुकोसिनोलेट्स नावाचा घटक यकृतातील डिटॉक्सिफिकेशन एंजाइम्सना चालना देतो. हे एंजाइम यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ब्रोकोलीत फायबरचं प्रमाण जास्त असतं, यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

Cinnamon : दालचिनी करेल त्वचेचं रक्षण, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

advertisement

गाजर - गाजर हे बीटा-कॅरोटीन आणि फ्लेव्होनॉइड्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे घटक यकृतातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि यकृताची सूज कमी करण्यास मदत करतात. गाजरातील दाहक-विरोधी गुणधर्म यकृताच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
व्यवसायासाठी 4 वर्षांची नोकरी सोडली, सुरू केलं फूड कॉर्नर, महिन्याला 70000 कमाई
सर्व पहा

भोपळा - भोपळा ही पौष्टिक भाजी आहे. ज्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर भरपूर असतात. भोपळा यकृतासाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण तो यकृताच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करतो. त्यातील घटक चरबीचे साठे कमी करण्यासाठी आणि यकृताचं कार्य सुधारण्यास मदत करतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fatty Liver : फॅटी लिव्हर टाळण्यासाठी या उपायांचा विचार करा, या पौष्टिक भाज्यांमुळे मिळेल यकृताला आराम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल