advertisement

Vitamin B12 : सर्वात आधी पायांवर दिसतात लक्षणं, Vitamin B12 ची कमतरता का ठरते धोकादायक ? जाणून घ्या सविस्तर

Last Updated:

व्हिटॅमिन बी 12 मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी, डीएनए संश्लेषणासाठी आणि स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन बी 12ची पातळी कमी झाली तर त्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊयात व्हिटॅमिन बी 12चं महत्त्व आणि लक्षणं.

News18
News18
मुंबई : व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर शरीरात अनेक परिणाम जाणवतात. व्हिटॅमिन बी 12 मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी, डीएनए संश्लेषणासाठी आणि स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन बी 12ची पातळी कमी झाली तर त्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात.
ही लक्षणं बहुतेकदा आपल्या पायांत प्रथम दिसून येतात, पण याकडे दुर्लक्ष केलं जातं. ही लक्षणं लवकर ओळखली तर व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता लवकर दूर करता येते. पाहूयात ही लक्षणं कोणती ?
पायांत मुंग्या येणं- पायांत सुया टोचल्यासारखं वाटणं हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं एक प्रमुख लक्षण आहे. तळवे किंवा बोटांमधे मुंग्या येणं सुरू होतं आणि कधीकधी हे प्रमाण वरच्या दिशेनं पसरू शकतं.
advertisement
बोटं सुन्न होणं - बोटांना टोचणं किंवा इतर स्पर्श, दाब न जाणवणं हे देखील या लक्षणांचा एक भाग आहे.
पायाच्या स्नायूंत कडकपणा - व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे स्नायूंच्या समन्वयात बिघाड होऊ शकतो. यामुळे स्नायूंमधे ताण, कडकपणा किंवा पायांच्या स्नायूंमधे कमकुवतपणा येऊ शकतो, ज्यामुळे चालणं देखील कठीण होऊ शकतं.
advertisement
पाय थंड पडणं किंवा पाय पिवळे पडणं - व्हिटॅमिन बी 12 हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह बिघडतो. याचा थेट परिणाम पायांवर होतो, ज्यामुळे पाय थंड होऊ शकतात आणि त्वचेचा रंग पिवळा होऊ शकतो.
पायात जळजळ - काहींना पायाच्या तळव्यांमधे किंवा संपूर्ण पायात तीव्र जळजळ जाणवू शकते, जी खूप त्रासदायक असू शकते.
advertisement
यापैकी कोणतीही लक्षणं सतत जाणवत असतील, तर त्यांना सामान्य थकवा किंवा वृद्धत्वाचं लक्षण म्हणून दुर्लक्ष करू नका. व्हिटॅमिन बी 12 दीर्घकालीन कमतरतेमुळे मज्जासंस्थेला कायमचं नुकसान होऊ शकतं, ज्यावर उपचार करणं कठीण होऊ शकतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin B12 : सर्वात आधी पायांवर दिसतात लक्षणं, Vitamin B12 ची कमतरता का ठरते धोकादायक ? जाणून घ्या सविस्तर
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement