दादर वेस्ट येथील कबुतरखान्यापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या उपाहारगृहात तुम्हाला साऊथ इंडियन आणि फ्युजन स्टाइलचे तब्बल 12 प्रकारचे पदार्थ अवघ्या 249 रुपयांत अनलिमिटेड स्वरूपात मिळतात. यात उत्तपा, डोसा, मसाला डोसा, इडली, मेदू वडा आणि लोकप्रिय साऊथ इंडियन राईस प्रकारांचा समावेश आहे.
पतीच्या निधनानंतर खचली नाही! 3 मुलींची आई यूट्यूब पाहून शिकली 'हे' काम, सुरू केला स्वतःचा उद्योग
advertisement
यामागे स्वप्नील गायकवाड या तरुणाचा उत्साह आणि ईच्छाशक्ती आहे . व्यवसायाने ऑडिटर असलेला स्वप्नीलला लहानापासून फूड बिझनेस करायचा होता, स्वतःचा एक वेगळा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगून होता. तीच कल्पना प्रत्यक्षात आणत त्याने ग्रीन पोटॅटो सुरू केलं.
स्वप्नील म्हणतो, लोकांना दर्जेदार आणि वेगळं काहीतरी कमी किमतीत मिळावं, हाच माझा व्यवसाय सुरु करण्यामागचा उद्देश होता.
सध्या ग्रीन पोटॅटो हे रेस्टॉरंट विद्यार्थ्यांपासून ते फूड ब्लॉगर्सपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरतंय.
ग्रीन पोटॅटो या रेस्टॉरंटमध्ये पाय टाकताच तुम्हाला पारंपरिक साऊथ इंडियन वातावरणाची अनुभूती मिळते. येथे भिंतींवर साऊथ इंडियन कल्चर दर्शवणाऱ्या चित्रांपासून ते कांजीवरच्या पाण्याच्या हंड्यांपर्यंत, आणि फिल्टर कॉफीच्या स्टील ग्लासांपासून पारंपरिक लाकडी फर्निचरपर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने निवडलेली आहे. आतलं इंटिरिअर हे एकाच वेळी आधुनिक आणि पारंपरिक यांचा सुंदर संगम वाटतो. सौम्य प्रकाश, हलकी पारंपरिक संगीत पार्श्वभूमीवर सुरू असलेली, आणि स्वच्छ व उबदार सजावट हे या ठिकाणाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.स्वप्नील गायकवाड यांनी ठरवून ही थीम ठेवली आहे, जेणेकरून जेवण अनुभवणाऱ्याला केवळ चवच नव्हे तर संस्कृतीचाही स्पर्श मिळावा.