TRENDING:

42 वर्षांची परंपरा, डबल भाजलेल्या सुपारीसाठी प्रसिद्ध, असं पान तुम्ही खाल्लंच नसेल

Last Updated:

अमरावतीमधील 42 वर्ष जुने पान सेंटर जयस्तंभ चौक येथे आहे. त्यांच्याकडील सुपारीमुळे सर्वत्र त्यांचे पान प्रसिद्ध झाले आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

अमरावती : अमरावतीमधील जयस्तंभ चौक येथे 1983 पासून रमेश बिजोरे यांचे बेस्ट पान कॉर्नर आहे. त्यांच्याकडे पाच प्रकारच्या सुपारी आहेत. कच्ची सुपारी, भाजलेली सुपारी, बारीक भाजलेली सुपारी, डबल भाजलेली सुपारी, बारीक डबल भाजलेली सुपारी अशा प्रकारच्या सुपारी ते ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पान बनवताना वापरतात. त्यांचे पान सेंटर हे गेल्या 42 वर्षांपासून एकाच ठिकाणी स्थित आहे. त्यांच्याकडील डबल भाजलेली सुपारी अतिशय प्रसिद्ध आहे. दूरदूरून त्यांच्याकडील पार्सल बोलावले जातात. दुकान छोटेसे असले तरीही त्यांच्या पानाची चव ही लोकप्रिय आहे.

advertisement

अमरावतीमधील बेस्ट पान कॉर्नरचे मालक रमेश बिजोरे यांच्याशी लोकल 18 ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, 1983 मध्ये मी अगदी छोटे पानाचे स्टॉल सुरू केले. मी खालीच दुकान घेऊन बसत होतो. काही दिवस ग्राहक फिरकत सुद्धा नव्हते. त्यांनतर मी घरीच सुपारीवर प्रक्रिया केली. सुपारी पुन्हा पुन्हा भाजून बघितली. तेंव्हा लक्षात आले की, डबल भाजलेली सुपारी चावायला सोपी जाते आणि चवीला सुद्धा छान लागते. तेव्हापासून माझ्याकडे 5 ते 6 प्रकारच्या सुपारी आहेत. डबल भाजलेली सुपारी ग्राहकांच्या अतिशय आवडीची आहे. सर्वात जास्त ग्राहक हे त्या सुपारीमुळे माझ्याकडे टिकून आहेत. विशेष म्हणजे महिला वर्ग ही सुपारी जास्तीत जास्त खातात. चावायला एकदम खसखशीत आहे.

advertisement

32 वनस्पतींचा चमत्कार, घरगुती पद्धतीनं बनवलं हेअर ऑईल, परिणाम पाहून लोकांची गर्दी

या सुपारीमुळेच अमरावतीमधील अनेक ग्राहक बाहेर जाताना पानाचे पार्सल घेऊन जातात. त्यामुळे आता नागपूर, पुणे, मुंबईपर्यंत आमच्या बेस्ट पान सेंटरमधून पार्सल गेले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी दरात उत्कृष्ट दर्जाचे पान आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून देतो. इतर ठिकाणी 30 ते 40 रुपये असे एका पानाची किंमत आहे. मी अजूनही 20 रुपयाला एक पान विकत आहे. यामागचे कारण हेच की, माझे काही ग्राहक गेल्या 42 वर्षांपासून माझ्याकडे टिकून आहेत. सुरुवातीला 5 रुपयाला मिळणारे पान आज 20 रुपयाला मिळत आहे, कारण इतर महागाई सुद्धा वाढली आहे. दिवसाला माझ्याकडून एकदम वर्दळ असल्यास 50 ते 60 पानांची विक्री होत असेल, असे रमेश यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
42 वर्षांची परंपरा, डबल भाजलेल्या सुपारीसाठी प्रसिद्ध, असं पान तुम्ही खाल्लंच नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल