Egg Expiry : अंड्यांचीही एक्सपायरी डेट असते का? 'या' ट्रीकने ओळखू शकता जुनं आणि ताज्या अंड्यातील फरक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपण नेहमीच दुधाची किंवा ब्रेडची एक्सपायरी डेट तपासतो, तशी अंड्यांची करतो का? बाजारात दिसणाऱ्या अंड्यांवर कोणतीही स्पष्ट 'समाप्तीची तारीख' (Expiry Date) लिहिलेली नसते, त्यामुळे ती ताजी आहेत की नाही, हे ओळखणे अनेकदा कठीण होते. पण याचा अर्थ असा नाही की अंड्यांना एक्सपायरी डेट नसते.
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, हे वाक्य तर तुम्ही अनेकदा ऐकत आला असाल. दररोज एक अंड खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अंड हा प्रोटिनचा उत्तम स्त्रोत आहे आणि त्यामुळे फक्त नाश्टाच नाही तर सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक पदार्थांमध्ये त्याचा वापर होतो. पण अंड्यांच्या बाबतीत एक समस्या नेहमीच उद्भवते, ती म्हणजे एक्सपायरी डेटची
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'बेस्ट बाय' (Best By) किंवा 'सेल बाय' (Sell By) तारीख: ही तारीख अंड्यांची गुणवत्ता (Quality) चांगली राहील, याची हमी देते. ही तारीख निघून गेल्यावरही अंडी खाण्यास सुरक्षित असू शकतात, जर ती व्यवस्थित फ्रीजमध्ये साठवलेली असतील तर.जर अंडी योग्य तापमानाला फ्रीजमध्ये साठवली, तर ती 'बेस्ट बाय' तारखेनंतरही 3 ते 5 आठवड्यांपर्यंत सुरक्षितपणे वापरली जाऊ शकतात.
advertisement
advertisement
शेल किंवा कवच तपासा (Check the Shell):अंडी फुटलेली किंवा तडकलेली नसावीत. शेल फुटलेले असल्यास, बॅक्टेरिया आत प्रवेश करू शकतात.अंड्यावर कोणत्याही प्रकारची घाण, विष्ठा किंवा रक्ताचे डाग नसावेत.पॅक केलेल्या कार्टनमध्ये जरी वास ओळखणे कठीण असले तरी, जर अंड्यातून त्वरित तीव्र, सल्फरसारखा (Sulphur-like) वास येत असेल, तर ते घेऊ नका.अंडी साठवण्याची योग्य जागा थंड असावी. दुकानदाराने अंडी थंड जागी (Refrigerated) ठेवली आहेत की नाही, याची खात्री करा.
advertisement
3. ताजेपणा तपासण्याची सोपी पद्धतघरी आणलेली अंडी ताजी आहेत की जुनी, हे तपासण्याचा हा सर्वात सोपा आणि वैज्ञानिक आधार असलेला मार्ग आहेएका मोठ्या भांड्यात थंड पाणी घ्या.त्या पाण्यात अंडे हळूच सोडा.अंडं तळाशी आडवे बसले याचा अर्थ अंडं पूर्णपणे ताजं आहे.अंडे उभे राहते, पण तळाला चिकटून राहते याचा अर्थ अंडे थोडे जुने आहे (सुमारे 1 आठवड्याचे), पण खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.अंडे तरंगते (Floats on the surface): याचा अर्थ अंडे खूप जुने आहे आणि ते वापरू नये.अंडे जुने झाल्यावर, त्याच्या आत हवा (Air) जमा होऊ लागते. जितकी जास्त हवा जमा होईल, तितके अंडे पाण्यावर तरंगते.
advertisement
advertisement
advertisement









