Dahi Tadka Aloo Recipe : स्वादिष्ट चमचमीत तडकेवाला दही आलू, झटपट तयार करा घरीच सोपी रेसिपी, संपूर्ण Video

Last Updated:

घरगुती चव, सुगंधी तडका आणि थंडगार दही यांचा अफलातून मेळ असलेली ही रेसिपी चवीला जितकी अप्रतिम तितकीच बनवायला अतिशय सोपी आहे.

+
झटपट

झटपट तयार करा स्वादिष्ट चमचमीत तडकेवाला दही आलू .

मुंबई : हलके-फुलके पण चविष्ट काहीतरी खायची इच्छा झाली की मनात सर्वात पहिले आठवते ते म्हणजे दही तडका आलू. घरगुती चव, सुगंधी तडका आणि थंडगार दही यांचा अफलातून मेळ असलेली ही रेसिपी चवीला जितकी अप्रतिम तितकीच बनवायला अतिशय सोपी आहे. कमी साहित्य, साधी पद्धत आणि फक्त काही मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ अगदी नवशिक्यांनाही सहज जमतो. तर चला रेसिपी पाहूया.
तडकेवाला दही आलू साहित्य
मध्यम आकाराचे बटाटे – 4 ते 5 (उकडून सोललेले)
दही – 1 कप (छान फेटलेले)
तेल – 1 टेबलस्पून
जिरे – 1 टीस्पून
हिंग – चिमूटभर
कांदा- 1 बारीक चिरलेला
टोमॅटो – 1 (बारीक चिरलेला)
हळद – ½ टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
advertisement
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार
कोथिंबीर – सजावटीसाठी
तडकेवाला दही आलू कृती
बटाट्यांची तयारी : उकडलेले बटाटे मोठे-मध्यम तुकडे करून बाजूला ठेवा.
तडका : कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, जिरे, हिंग, हिरवी मिरची आणि आले घाला. छान परतून घ्या.
advertisement
मसाले : आता हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड घालून काही सेकंद परता. मसाले जळू नयेत याची काळजी घ्या.
बटाटे घालणे : मसाल्यात बटाट्याचे तुकडे घालून हलके हलके मिक्स करा. 2 मिनिटे परता.
दही घालणे : गॅस बंद करून फेटलेले दही हळूहळू कढईत घाला आणि सतत ढवळत राहा. दही फाटू नये म्हणून हा टप्पा महत्त्वाचा असतो.
advertisement
मीठ आणि शेवटची सजावट : मीठ घाला आणि वरून ताजी कोथिंबीर पेरा.
कशासोबत सर्व्ह कराल?
दही आलू गरम गरम फुलक्यासोबत, पराठा किंवा साध्या भातासोबत अप्रतिम लागतो.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Dahi Tadka Aloo Recipe : स्वादिष्ट चमचमीत तडकेवाला दही आलू, झटपट तयार करा घरीच सोपी रेसिपी, संपूर्ण Video
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement