TRENDING:

तब्बल 90 वर्ष जुनं पुण्यातील हाऊस, अस्सल पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध, तुम्ही कधी चाखलीय का इथली चव? Video

Last Updated:

पुण्यातील न्यू पूना गेस्ट हाऊस हे तब्बल 90 वर्ष जुनं हॉटेल आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे न्यू पूना गेस्ट हाऊस आपल्या पारंपरिक भोजनासाठी प्रसिद्ध आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी 
advertisement

पुणे : पुण्यात अनेक प्रसिद्ध असे खवय्यांसाठी ठिकाण आहेत. पुण्यातील न्यू पूना गेस्ट हाऊस हे तब्बल 90 वर्ष जुनं हॉटेल आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे न्यू पूना गेस्ट हाऊस आपल्या पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध आहे. अनेक नामवंत व्यक्ती, साहित्यिक, कलाकार आणि राजकारणी आजही येथे आवर्जून येतात. न्यू पूना गेस्ट हाऊस म्हणजे फक्त हॉटेल नाही, तर पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे.

advertisement

पुण्यातील तुळशीबाग मार्केट आणि बुधवार पेठ इथे असलेलं न्यू पूना गेस्ट हाऊस हे 90 वर्ष जुनं असून 1935 मध्ये याची सुरुवात झाली होती. इथे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. न्यू पूना गेस्ट हाऊसची सुरुवात 1935 साली नानासाहेब सरपोतदारांनी केली. ते कोकणातून मूक चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुण्यात येऊन सारसबागेजवळ आर्यन फिल्म कंपनी सुरू करून 49 मूकचित्रपटांची निर्मिती केली. परंतु चित्रपटसृष्टीतील अस्थिरता लक्षात घेता स्वतःच्या कुटुंबासाठी एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा यासाठी न्यू पूना गेस्ट हाऊसची निर्मिती केली. आता त्यांची चौथी पिढी हा व्यवसाय चालवते आहे.

advertisement

35 वर्ष जुनं पुण्यातील गृह उद्योग, खवय्यांची असते मोठी गर्दी, इथली पदार्थांची चव मन तृप्त करणारी, Video

न्यू पूना गेस्ट हाऊसला 90 वर्ष पूर्ण झाले असून खास करून महाराष्ट्रीयन जेवण हे तयार केले जाते. यामध्ये दडपे पोहे, थालीपीठ, मिसळ हे पूर्वीपासून करत असून पारंपारिक वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या या देत असतो. स्पेशल थाळीमध्ये मसालेभात, आळू भाजी, बटाटा भाजी, गोड असतं तर ग्रामीण थाळीमध्ये पालेभाज्या, भाकरी, पिठलं हे देत असतो. हे खाण्यासाठी अनेक नामवंत लोक आजही येतात. यामध्ये मराठी अभिनेते आणि राजकीय लोक देखील आहेत. हे खाण्यासाठी लोकांची कायम गर्दी असते, अशी माहिती शर्मिला सरपोतदार यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
तब्बल 90 वर्ष जुनं पुण्यातील हाऊस, अस्सल पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध, तुम्ही कधी चाखलीय का इथली चव? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल