सोलापूर शहरातील गुरुनानक चौकातील सोलापूर क्लब समोर गेल्या पंधरा वर्षांपासून आजम बाली हे उसाचा रस विक्री करत आहे. सुरुवातीला या ठिकाणी एका उसाच्या ग्लासची किंमत दहा रुपये इतकी होती. आणि आजही या ठिकाणी एका उसाच्या ग्लासची किंमत दहा रुपये इतकीच आहे.
चालता-फिरता देशी फ्रिज! कुठेही-केव्हाही कडक उन्हात मिळणार थंडगार पाणी, 'ही' वस्तू का आहे खास?
advertisement
सोलापूर शहरातील वाढता उन्हाळा लक्षात घेता गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वच लोकांनी थंडगार उसाचा रस प्यावा म्हणून आजम बाली यांनी उसाच्या ग्लासाच्या किंमतीत वाढ केली नाही. अनेक ग्राहक रस पिऊन पार्सल घेऊन घरी जातात. बरेच जण 5 ते 6 ग्लास रस घरी पार्सल नेतात. आजम बाली हे आधी लाकडी घाण्यावर उसाचा रस काढत होते. पण आता बदलत्या काळानुसार त्यांनी स्टील बॉडी असलेल्या मशीनवर उसाचा रस काढत आहेत. स्टील मशीनवर गाळल्यामुळे उसाचा रस अजिबात काळा पडत नाही. तो पांढरा स्वच्छ राहतो. या रसाची चव अक्षरशः अमृतमय असते, अशी प्रतिक्रिया ग्राहक देतात.
आजम बाली यांचा उसाचा रस सोलापूर ऑफिस क्लब समोर असून या ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी उसाचा रस पिण्यासाठी नेहमीच गर्दी असते. दररोज 400 ते 500 उसाचे ग्लास उसाचा रस या ठिकाणी विक्री होत आहे. तर सर्व खर्च वजा करून आजम बाली यांना दिवसाला 3 ते 4 हजार रुपये मिळतात.