तुम्ही सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ पाहिले असतील ज्यात लोक डाळ-भात एकत्र बनवतात. कुकरमध्ये खालील डाळ फोडणीला घातली जाते आणि त्यावर भांड्यात भात लावतात. पण पिठलं भात असं शक्य नाही. पण खरंतर तुम्ही भात आणि पिठलं एकत्र बनवू शकता. सोशल मीडियावर भातावरच्या पिठल्याच्या रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Lemon Pickle : लिंबाचं लोणचं जमत नाही, मग बनवा घोळ लिंबू; साधी सोपी रेसिपी आणि औषधीही
advertisement
आता भातावरचं पिठलं कसं बनवायचं ते पाहुयात. सगळ्यात आधी तुम्हाला जितका भात करायचा आहे, तितके तांदूळ चांगले धुवून भिजवून घ्या. आता गॅसवर पातेलं ठेवून त्यात तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी घेऊन तांदूळ, मीठ आणि थोडं तेल टाकून भात शिजायला ठेवा.
आता एका वाटीत दही बेसन, मीठ, हळद, तेल, हिंग पाणी टाकून मिश्रण बनवून घ्या. भात अर्धा शिजला की त्यात हे दही-बेसनचं मिश्रण वर ओता आणि भाताच्या भांड्यावर झाकण ठेवून घ्या.
Kitchen Tips : लसूण की कांदा, फोडणीत पहिलं काय टाकायचं? क्रम चुकला तर बिघडते चव
तोपर्यंत आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कडीपत्ता आणि लसूण टाका. ही फोडणी भातावर टाकलेल्या पिठल्यावर ओता. थोडा वेळ झाकण ठेवा. थोड्या वेळाने गॅस बंद करा. गरमागरम भातावरचं पिठलं खायला तयार.
@archees_kitchen11 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेहमीच्या पिठलं भातापेक्षा हे अशा पद्धतीने भातावरचं पिठलं करून पाहा आणि कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
