TRENDING:

Shrikhand Recipe : गुढी पाडव्याला फक्त 1 नाही तर बनवा 4 प्रकारचे श्रीखंड! एकाच बेसपासून 10 मिनिटांत होईल तयार

Last Updated:

Shrikhand recipe 4 different types : ही रेसिपी तशी विशेष आहे. कारण या श्रीखंडाच्या एकाच बेसमध्ये आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच फ्लेवरचे श्रीखंड बनवणार आहोत. यामध्ये आपण ड्राय फ्रुट श्रीखंड, केशर पिस्ता श्रीखंड, आम्रखंड, गुलाब श्रीखंड हे सर्व पाहणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गुढी पाडवा आता अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. मराठी नववर्षाची सुरुवात या दिवसापासून होते. म्हणून हा सण सर्वांसाठीच खूप आनंदाचा आणि चैतन्याचा असतो. या दिवशी बहुतांश लोकांच्या घरी नैवेद्य आणि जेवणाला श्रीखंड पुरीचा बेत असतो. बरेच लोक श्रीखंड घरी बनवतात. आज आम्ही तुम्हाला श्रीखंडाचीच रेसिपी सांगत आहोत.
श्रीखंड रेसिपी 4 विविध प्रकार
श्रीखंड रेसिपी 4 विविध प्रकार
advertisement

पण ही रेसिपी तशी विशेष आहे. कारण या श्रीखंडाच्या एकाच बेसमध्ये आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच फ्लेवरचे श्रीखंड बनवणार आहोत. यामध्ये आपण ड्राय फ्रुट श्रीखंड, केशर पिस्ता श्रीखंड, आम्रखंड, गुलाब श्रीखंड हे सर्व पाहणार आहोत. ही रेसिपी redsoilstories या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे.

असं बनवा श्रीखंड

- सर्वात आधी थोडं दही घेऊन ते व्यवस्थित फेटून घ्या.

advertisement

- दुसरीकडे एका मोठ्या भांड्यात कोमट दूध घ्या. या दुधामध्ये फेटलेलं दही टाकून व्यवस्थित मिक्स करा.

- या दुधाचं दही होण्यासाठी रात्रभर हे झाकून ठेवा.

- दुसऱ्या दिवशी तयार दही एका कॉटनच्या कापडाच्या साह्यायाने गाळून त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका.

- हे दही आणि कापडाचं गाठोडं असंच गाळणीमध्ये 4 तास ठेवा. यावर काहीतरी वजन ठेवा.

advertisement

- 4 तासानंतर हे दही एकदम घट्ट पनीरसारखे होईल.

- आता ते पुरणाच्या गाळणीमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये पिठी साखर टाकून हे दोन्ही गाळणीतून दाबून गाळून घ्या.

- आता हे मिश्रण चांगलं फेटून घ्या. अशाप्रकारे साधं श्रीखंड तयार होईल.

- यानंतर यातून थोडे थोडे श्रीखंड वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घ्या.

ड्राय फ्रुट श्रीखंड

advertisement

एका वाटीमध्ये श्रीखंड घ्या, त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे आणि वेलची पूड घालून मुका करा. हे तुमचं ड्राय फ्रुट श्रीखंड तयार आहे.

केशर पिस्ता श्रीखंड

वाटीतील श्रीखंडामध्ये केशर भिजवलेले दूध,पिस्ता आणि वेलची पूड घालून मिक्स करा. अशाप्रकारे सर्वांचं आवडतं केशर पिस्ता श्रीखंड तयार होईल.

आम्रखंड

एका वाटीमध्ये श्रीखंडात आंब्याचा व्यवस्थित बारीक करून गाळलेला मऊसूत रस टाका. त्यावर वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. अशाप्रकारे तुमचे आम्रखंड तयार आहे.

advertisement

रोज (गुलाब) श्रीखंड

एका वाटीत असलेल्या श्रीखंडामध्ये रोज सिरप, वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलकंद घालून मिक्स करा. अशाप्रकारे तुमचे रोज श्रीखंड तयार होईल.

अशाप्रकारे श्रीखंडाच्या एकाच बेसपासून तुम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड बनवू शकता. या गुढी पाडव्याला हे प्रकार नक्की ट्राय करा आणि प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार श्रीखंड वाढा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मटणापासून ते सगळेच मासे, 140 वर्षे जुनं पुण्यातलं हे मार्केट तुम्हाला माहितीये का? Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Shrikhand Recipe : गुढी पाडव्याला फक्त 1 नाही तर बनवा 4 प्रकारचे श्रीखंड! एकाच बेसपासून 10 मिनिटांत होईल तयार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल