छत्रपती संभाजीनगर : आपण आपल्या लहानपणी लब्दो हे खाल्लेच असतील. आता लब्दो म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लब्दो हे वाळलेल्या बोरापासून तयार करतात. ही एक स्वीट डिश आहे आणि याच लब्दोचा व्यवसाय करून छत्रपती संभाजीनगर शहरातील पिता-पुत्र चांगली कमाई करत आहेत. छोट्याशा स्टॉलवर गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील शेख हारून आणि त्याचा मुलगा शेख सुलतान हे गेल्या 30 वर्षांपासून लब्दो व्यवसाय करतात. शेख हारून हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामधील आहेत. ते संभाजीनगर शहरामध्ये नोकरीच्या शोधात आले होते. त्यांनी काही दिवस खाजगी कंपनीत नोकरी केली. त्यासोबत त्यांनी मंडईमध्ये देखील काम केलं. पण त्या ठिकाणी त्यांना ते काम आवडलं नाही आणि त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी व्यवसाय करूयात. त्यांना काहीतरी खाद्यपदार्थाचाच व्यवसाय करायचा होता. पण इतरांपेक्षा वेगळा करायचा होता. म्हणून त्यांनी ठरवलं की लब्दो व्यवसाय आपण करूयात.
हे फक्त पुणेकरच करू शकता! इथं मिळतेय चक्क पिझ्झा मिसळ, चिझ पण टाकून मिळेल!
कारण की शहरामध्ये हे कोणीच विक्री करत नाही आणि आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. 30 वर्षांपासून शेख हा व्यवसाय करत आहेत. त्यांचा मुलगा शेख सुलतान हा देखील त्यांना व्यवसायामध्ये मदत करतो. शेख सुलतान यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी देखील खाजगी कंपनीत नोकरी केली. पण त्यांना ते काम जमलं नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आपल्या वडिलांना आपल्या व्यवसायामध्ये मदत करू. म्हणून वडील आणि मुलगा दोघेही मिळून हे लब्दो विक्री करतात.
छत्रपती संभाजीनगर शहरातील आमखास मैदानाजवळ कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर हा छोटासा स्टॉल ते लावतात. हे लब्दो तेच घरीच तयार करतात. त्यामध्ये त्यांना त्यांची पत्नी, त्यांची सून, त्यांचा मुलगा बनवायला मदत करतात. अतिशय चांगल्या पद्धतीने ते घरी तयार करतात. ते संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बोर जमा करतात आणि त्याला वर्षभर साठवून ठेवतात. गंगापूर, कन्नड, लासुर या ठिकाणाहून त्याचबरोबर जिल्ह्याच्या बाहेरून देखील ते बोर खरेदी करतात.
दररोज त्यांना 10 किलो पेक्षा जास्त लब्दो तयार करावा लागतो. शनिवार, रविवार असेल तर 15 किलोच्या वरती हा लब्दो तयार करावा लागतो. त्यांचा लब्दो खाण्यासाठी अनेक मोठे लोक देखील त्यांच्याकडे येतात. त्याचबरोबर त्यांनी स्विगी वरून देखील त्यांचा व्यवसाय वाढवलेला आहे. स्विगी वरून देखील त्यांना भरपूर अशा ऑर्डर मिळतात. लब्दो विक्रीतून दिवसाला 2 हजार रुपयांची कमाई होते, असं शेख हारून सांगितलं आहे.





