कोहळ्याचे बोंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य
शिजवून घेतलेलं कोहळ, गव्हाचे पीठ, मीठ, पिठीसाखर/गूळ आणि तळण्यासाठी तेल हे साहित्य लागेल.
Pune Food : 33 वर्षांपासून प्रसिद्ध, पुण्यात इथं मिळते लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल
कोहळ्याचे बोंड बनविण्याची कृती
सर्वात आधी कोहळ्याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याचे काप करून ते शिजवून घ्यायचे आहे. नंतर सर्वात आधी शिजवलेल्या कोहळ्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. पाणी काढून झाले की, कोहळ चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं. बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे.
advertisement
गव्हाचे पीठ हे अंदाजानुसार टाकायचे आहे. जास्त टाकून घ्यायचे नाही. भजे बनवण्यासाठी लागणाऱ्या मिश्रणाप्रमाणेच हे मिश्रण तयार करायचे आहे. नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्या. त्यानंतर लगेच पिठी साखर किंवा गूळ टाकून घ्यायचा आहे. साखर किंवा गूळ खूप जास्त टाकायचा नाही. अति गोड झाल्यास गुलगुले तेलात विरघळतात. त्यामुळं प्रमाणात साखर टाकून घ्यायची आहे. सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे.
मिश्रण तयार झाल्यानंतर बोंड तळून घ्यायचे आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल जास्त गरम झालेलं लागेल. तेल गरम झालं की, बोंड टाकून घ्यायचे आहे. जशी आपण भजी बनवतो त्याचप्रमाणे हे बोंड करायचे आहे. तेलात व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. अशाप्रकारे बोंड तयार होईल. कोहळ्याचे बोंड तयार झाले की, गरमागरम हे बोंड तुम्ही खाऊ शकता. थंड झाल्यानंतर याच्या चवीमध्ये बदल पडतो त्यामुळे हे बोंड गरमागरम खाल्ली जातात.