लांडगे... नाव वाचून विचित्र वाटेल. पण पदार्थ पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. विचित्र नावाची पण चविष्ट ही रेसिपी... आता आपण बिलकुल वेळ वाया नको घालवूया. यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसं बनवायचं, त्याची कृती पाहुयात.
advertisement
साहित्य
कणिकेसाठी : गव्हाचं पीठ, हळद, मीठ, तेल
सारणासाठी : भिजवलेली मूगडाळ - 1 वाटी, भिजवलेली तूरडाळ - 1 वाटी, भिजवलेली हरभरा डाळ - 1 वाटी, जिरं, लसूण, हिरवी मिरची, आलं, मीठ, कोथिंबीर
फोडणीसाठी : तेल , मोहरी , जिरे, तीळ, कढीपत्ता, कोथिंबीर
कृती
गव्हाच्या पिठात हळद, मीठ आणि थोडं तेल टाकून मिक्स करून घ्या. थोडंथोडं पाणी टाकून पीठ नीट मळून घ्या. पिठाचा मळलेला गोळा 10 मिनिटं झाकूण ठेवा.
आता भिजवलेली तूर डाळ मिक्सरमध्ये वाटा. नंतर त्यात मिरची, आलं, लसूण, जिरं टाकून पुन्हा वाटून घ्या. भिजवलेली मूग डाळ आणि चणाडाळही वाटून घ्या. आता सगळं वाटण मिक्स करून त्यात चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून नीट मिक्स करून घ्या.
आता मळलेल्या पिठाचे गोळे करून, चपातीसारखे लाटून घ्या. त्यावर डाळीचं मिश्रण लावून घ्या. नंतर रोल करून घ्या. आता हे रोल वाफवून घ्यायचे. थंड झाले की त्याचे काप करून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, जिरं, तीळ, कडीपत्त्याची फोडणी करा. फोडणी चांगली तडतडली की त्याच तयार केलेले लांडगे टाकून परतून घ्या. वरून कोथिंबीर पसरवून घ्या. आता लांडगे खायला तयार.
युट्युब चॅनेवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हे लांडगे कधी खाल्ले आहेत का? नाही तर करून पाहा आणि कसे झाले आम्हाला नक्की सांगा. तुमच्याकडेही अशी काही पारंपारिक, भन्नाट, हटके रेसिपी असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा.
