जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्टेशनजवळ सागर आणि काजल या तरुण दाम्पत्याने सुरू केलेल्या स्टॉलवर ही मिसळ उपलब्ध आहे. सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी आणि संध्याकाळच्या वेळेस हलक्याफुलक्या जेवणासाठी या स्टॉलवर चांगलीच गर्दी दिसते.
सोलापुरातील फेमस शिक कढई, खवय्यांची असते खाण्यासाठी मोठी गर्दी, तुम्ही कधी चाखलीये का चव?
या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक वाटाण्याऐवजी येथे मटकीचा वापर केला जातो. मटकी उकडून त्यात खोबरं-कांद्याचं वाटप, घरगुती मसाले आणि मालवणी मसाल्यांचा तडका दिला जातो. कोकणातील घराघरात बनणारी ही डिशच आता मुंबईतल्या स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणचा स्वाद अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळते आहे.
advertisement
सागर आणि काजल हे दोघेही मूळ कोकणातील आहेत. जवळपास दहा वर्षे त्यांनी प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी केली. मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून स्थानिक परंपरा आणि चव पुढे न्यावी, या हेतूने त्यांनी कोकण स्पेशल मिसळ या उपक्रमाची सुरुवात केली.
या मिसळीची किंमत फक्त पन्नास रुपये ठेवण्यात आली आहे. परवडणारी किंमत आणि वेगळी चव यामुळे आसपासच्या परिसरातील ग्राहकांचा प्रतिसाद सकारात्मक मिळत आहे. स्टॉलचे वेळापत्रक दररोज सकाळी सात ते दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत असे आहे. जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानकाजवळ जाणाऱ्यांसाठी हा नवा पर्याय ठरत आहे.