TRENDING:

Mirchi Recipe : भाजी नसेल तेव्हा बनवा खूड मिरचीचं पाणी; भाकरीसोबत खायला लय भारी

Last Updated:

Mirchi Recipe Video : मिरचीची चटणी, लोणचं तुम्ही खाल्ला असाल पण कधी मिरचीचं पाणी ट्राय केलं आहे का? विचित्र वाटला तरी महाराष्ट्रातीलच हा एक पारंपारिक पदार्थ आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मिरची... सामान्यपणे आपण फोडणीत वापरतो. त्याची चटणी बनवतो, लोणचं बनवतो. पण तुम्ही कधी मिरचीचं पाणी बनवलं आहे का? हो मिरचीचं पाणी जे भाजीसारखं भाकरीसोबत खातात. हो बरोबर वाचलंत. खूड मिरचीचं पाणी एक पारंपारिक पदार्थ आहे. ज्याचा रेसिपी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

भाजी नसेल तेव्हा काय करायचं किंवा भाजीचा कंटाळा आला आहे तेव्हा तुम्ही खूड मिरचीचं पाणी बनवू शकता. हा खान्देशी पदार्थ आहे. जो अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होणार असा आहे. आता त्यासाठी काय साहित्य लागतं आणि तो कसा बनवायचा ते पाहुयात.

खूड मिरचीचं पाणी कसं बनवायचं?

कढईत तेल गरम करा, त्या जिरं टाका. जिरं फुललं की त्यात लसूण ठेचून टाका. लसूण लालसर होईपर्यंत परता. आता यात लाल मिरच्या टाकून परतायच्या. यात पाणी आणि मीठ टाकून एक उकळी काढायची.

advertisement

दुसरी पद्धत म्हणजे, जिरं, मेथी कुटून घ्या, यातच लसूण पाकळ्या ठेचून घ्या. आता कढईत तेल गरम करा त्यात कुटलेलं जिरं, मेथी आणि लसूण टाका. हळद आणि हिंग टाकून परतून घ्या. सुकी मिरची टाकून परतून घ्या. पाणी ओता आणि वरून कोथिंबीर, मीठ, लिंबू रस टाकून एक उकळी येऊ द्या.

advertisement

आता ही रेसिपी पाहिल्यावर न पिताच तुमच्या नाकाकानातून धूर आला असेल. मिरचीचं पाणी कसं काय खायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या दोन्ही व्हिडीओच्या कमेंटमध्ये हा पदार्थ खूपच छान लागत असल्याचं सांगितलं आहे.

हे खायचं कसं?

आता हे खायचं कसं तर भाकरी मोडून त्याचे तुकडे करून त्यावर हे पाणी ओतायचं आणि खायचं. बाजरीच्या भाकरीसोबत हे खूप छान लागत असल्याचं व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.

Dosa Recipe : डोसा तेलात फ्राय करून एकदम नवीन पदार्थ; कुठेच पाहिली नसेल ही रेसिपी

काही युझर्सनी याला आपण खोडमिटची पाणी बोलत असल्याचं सांगितलं आहे. तर काहींनी यात टोमॅटो, कुरडई, वडे टाकण्याचा सल्लाही दिला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

तुम्ही एकदा खूड मिरचीचं पाणी बनवून पाहा आणि कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Mirchi Recipe : भाजी नसेल तेव्हा बनवा खूड मिरचीचं पाणी; भाकरीसोबत खायला लय भारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल