मुंबई : मुंबई आणि पाव यांचं नातं अतूट आहे. मुंबईतील अनेक घरं आणि व्यवसाय आजही पावावर अवलंबून आहेत. मात्र, वाढत्या महागाईमुळे आता पावाच्या किंमतीत 3 ते 5 रुपयांनी वाढ होणार आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे बॉम्बे हायकोर्टाने दिलेला आदेश, ज्याअनुसार शहरातील बेकऱ्यांना पारंपरिक कोळसा आणि लाकडाच्या ओव्हनऐवजी पर्यावरणपूरक PNG (पाइप्ड नॅचरल गॅस) किंवा अन्य स्वच्छ इंधनाचा वापर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे बेकरी उत्पादकांवर अतिरिक्त खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम पावाच्या किंमतीवर होणार आहे.
advertisement
वडा पाव, मिसळ पाव आणि पाव भाजीसाठी नवा आर्थिक फटका पावाच्या किंमतीत वाढ झाल्याने वडा पाव, मिसळ पाव, पाव भाजी, दाबेली यांसारख्या लोकप्रिय पदार्थांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. याचा थेट परिणाम किरकोळ विक्रेत्यांवर होईल, जे आधीच वाढत्या महागाईमुळे अडचणीत आहेत.
शिक्षण आठवी नापास, 50 रुपयांसाठी काम करणारा तरुण कमतोय आता महिन्याला 2 लाख!
वडा पाव विक्रेत्यांचे मत
वडा पाव विक्रेते दीपक पवार म्हणतात की, पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करणे हा योग्य निर्णय आहे. आणि सर्व बेकरी मालकांनी तो मान्य केला पाहिजे. पण यासाठी पावाची किंमत वाढवणे चुकीचे आहे. जर मैद्याची किंमत वाढली असेल तरच पाव महाग झाला पाहिजे, केवळ नवीन इंधनामुळे नव्हे. इतकी वर्ष बेकरी व्यवसायात आहात, म्हणजेच नफा झालाच असेल. त्यामुळे याचा सुरुवातीचा खर्च बेकरी मालकांनी स्वतः उचलायला हवा. पावाच्या किंमतीत वाढ झाल्यास आमच्यासारख्या किरकोळ विक्रेत्यांवर मोठा आर्थिक ताण येईल.
ते पुढे म्हणतात, आज वडा पावची किंमत 20 रुपये आहे. बटाटा आणि तेल यांचीही किंमत वाढली आहे. त्यात जर पाव महाग झाला तर हा खर्च परवडणार नाही. जर आम्ही वडा पावची किंमत वाढवली तर ग्राहक आमच्याकडे कमी होतील. पाणीपुरी, दाबेली यांसारखे पदार्थ कमी खर्चिक आहेत, त्यामुळे त्यांची किंमत वाढली तरी विक्रीवर मोठा परिणाम होणार नाही. पण वडा पाव विक्रेत्यांना हा फटका बसू शकतो.
ललिता जाधव गेली 20 वर्षे वडा पाव विकणाऱ्या व्यावसायिका म्हणतात, आत्तापर्यंत पावाची किंमत वाढली, कधी बटाटा महागला, तर कधी तेल. पण आता सगळंच महाग झालंय. जर वडा पाव महाग झाला, तर शाळकरी आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही तो परवडणार नाही.
बेकरी उत्पादकांचे मत
पर्यावरण वाचवण्यासाठी मी गाड्या ऑटो मोबाईल इंडस्ट्री मागे लागत नाही त्यांच्याकडून तर जास्त प्रदूषण होतं. आम्ही मान्य करतो प्रदूषण होत आहे आणि सरकारचा निर्णय स्वीकारतो पण मग आज मुंबईत अनेक असे मोठे मोठे हॉटेल आहेत जिकडे चुलीवरच मटण, चुकवरीची भाकरी मिळते. मग त्यामुळेही पर्यावरणाचा ऱ्हास होऊन प्रदूषण होतंच आहे मग इकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. शासनाने आम्हला सबसिडीद्यावी कारण या कारखान्याचे रूपांतर करायचे म्हंटल्यावर प्राथमिक खर्च जास्त आहे. आणि पावाचे दर महाग होणारच कारण वीज बिल परवडणार नाही. त्यामुळे बेकरी उत्पादनात किंमतीत वाढ होईलच, असं बेकरी व्यवसायिक सतीश माने यांनी सांगितलं.
सामान्य ग्राहकांवर परिणाम
महागाईच्या काळात पावाच्या किंमतीत वाढ झाल्यास सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. मुंबईकरांसाठी वडा पाव हा स्वस्त आणि पोटभरणारा पर्याय राहिला आहे. पण जर त्याची किंमत वाढली, तर तोही सर्वसामान्यांना परवडणार नाही.