अखंड 144 वर्षांची परंपरा
पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये 'दोराबजी अँड सन्स' (Dorabjee and sons) हे सर्वात जुने रेस्टॉरंट आहे. 1878 साली या रेस्टॉरंटची स्थापना सोराबाजी दोराबजी या पारसी गृहस्थाने केली. आणि गेले 144 वर्ष झाले पुणेकर खवय्यांच्या जिभेचे चोचले त्या रेस्टॉरंटद्वारे पुरवले जातात. दोराबाजी यांनी एका छोट्या चहाच्या दुकानापासून आपल्या रेस्टॉरंटची सुरुवात कॅम्पमध्ये केली. पारशी लोकांच्या अस्सल पदार्थासाठी हे रेस्टॉरंट ओळखले जाते. विशेष म्हणजे गेल्या 144 वर्षापासून त्यांनी ही खास चव जोपासली आहे. 'पारशी पध्दतीचे जेवण आम्ही अजूनही कोळशांवर बनवतो. ते बनवायला खूप वेळ लागतो. पाथरानी मच्छी, मटण खिमा, मटण बिर्याणी, लग्नमें कस्टड, लिव्हर, भेजा, पुलाव दाल, हे पारंपारिक पारसी पदार्थ आमची खासियत आहे,' असं दोराबाजी सांगतात.
advertisement
आता खा वर्षभर टिकणारी पोळी; पुण्याच्या इंजिनिअरनं असा लावला शोध PHOTOS
गेल्या चार पिढ्यांपासून पुण्यातील दोराबाजी अँड सन्स हे रेस्टॉरंट दिमाखदारपणे कॅम्प मध्ये खवय्यांची सेवा करतंय. त्यामुळे या हॉटेलचे ग्राहकही तितकेच जुने आहेत. गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून नियमितपणे या हॉटेलमध्ये पारसी पदार्थ खाण्यासाठी ग्राहक येतात. आपणही हॉटेलमध्ये फेरफटका मारल्यास असे ग्राहक हमखास भेटतात.
पिढ्यानपिढ्या चव कायम
काळानुसार अनेक बदल होत असले तरी जुन्या रेसिपी तशाच ठेवण्याचं अवघड काम या रेस्टॉरंटनं केलंय. यामधील पुलाव दाल शिजण्यासाठी तब्बल 3 तास वेळ लागतो. पाथरानी मच्छी विशिष्ट मसाले वापरून केळीच्या पानांमध्येच बनवली जाते. इथं मटण रस्सा वेगळा शिजवून त्यामध्ये लागेल तसे मटणाचे तुकडे टाकून ग्राहकांना दिले जातात. खाद्यपदार्थ बनवण्याची ही परंपरा जपल्यानंच खवय्या पुणेकरांचे हे आवडचे ठिकाण आहे. अनेकदा दुपारी एक वाजताच इथले सर्व पदार्थ संपले असतात.
मिलेट्सचा आहारात समावेश करताय? हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
लगन मे कस्टर्ड फेमस
या रेस्टॉरंटचा 'लगन मे कस्टर्ड' हा गोड पदार्थ देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. तसंच त्यांनी ग्राहकांसाठी पार्सल सेवा देखील सुरू केली आहे. पारशी सणाच्या काळात इथं मोठी गर्दी होते. गेल्या 144 वर्षांपासून अस्सल पारसी पद्धतीची खाद्य संस्कृती जपणाऱ्या रेस्टॉरंटला आवर्जून एकदा तरी भेट द्यावी, असं पुणेकर म्हणतात.
