ठाणे: सध्या अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. ठाण्यातील दोन महिला उद्योजिका सुद्धा गेले अनेक वर्ष एक व्यवसाय चालवत आहेत. ठाणे स्थानकापासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर फिशटेल सीफूड नावाचे होलसेल आणि रिटेल दुकान आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळी होलसेल दरात मिळतात. त्यामुळे अगदी डोंबिवली, कल्याण आणि संपूर्ण ठाण्यातून या ठिकाणी लोक मच्छी घ्यायला येतात. दीप्ती माने आणि स्वप्ना यादव यांनी सुरू केलेला हा व्यवसाय सध्या ठाणेकरांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. परवडणारे दर आणि ताजी मासोळी हेच यांचं वैशिष्ट्य आहे.
advertisement
फिशटेल सीफूड येथे पापलेट, सुरमई, रावस, घोळ, खेकडा, मुशी, मांदेली, बोंबील असे सगळ्या प्रकारची मच्छी मिळेल. इथले सगळे मासे ताजे असल्यामुळे सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. खेकड्यांमध्ये तर तुम्हाला मोठे खेकडे इथे हमखास मिळतील. कोळंबी सुद्धा सगळ्यात मोठी कोळंबी, मग त्याहून छोटी आणि अगदी लहान अशा पद्धतीमध्ये मिळेल. इथे मिळणारी ही मच्छी अगदी ताजी असून फक्त 380 रुपयांना तुम्हाला मिळेल. यांच्या इथे मिळणारा हलवा आणि घोळ मासा सुद्धा इतका मोठा आहे की गिऱ्हाईक याच्याकडे आपसूकच आकर्षित होतात. तर पापलेटमध्ये देखील इथं 3 प्रकार मिळतात.
वकिलीचं शिक्षण, पण आवड वेगळीच; सुरू केला स्वत:चा ब्रँड, सेलिब्रिटींचीही लागतेय रांग
कशी झाली सुरुवात?
ओल्या मच्छी सोबतच आमच्याकडे सुकी मच्छी आणि मसाले, अंडी सुद्धा मिळतील. रोज सकाळी लवकर जाऊन मच्छी खरेदी करणं प्रत्येक ऑफिसला जाणाऱ्या महिलेला जमत नाही. म्हणूनच आम्ही दोघींनी मिळून फिशटेल सुरू केलं. त्यामुळे इथे मच्छी विकत घेतल्यानंतर ती साफ करण्याची जबाबदारी आमचीच असते. त्यामुळे गृहिणींना फक्त घरी जावून ती बनवायची असते. त्यामुळे गृहिणींचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. तसेच आम्ही वाजवी दरात घरपोहोच सुविधाही देतो, असे दिप्ती माने यांनी सांगितले.
दरम्यान, ताजी मासळी होलसेल दरात घ्यायची असेल तर ठाणेकरांसाठी फिशटेल हा उत्तम पर्याय आहे. ठाणे स्थानकापासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर कोलबाड येथील महावील माइलस्टोनच्या बाजूलाच फिशटेल हे दुकान आहे. कावेसर जीबी रोड येथेही यांची एक शाखा असून इथं देखील ग्राहकांची नेहमीच गर्दी असते.