ओरिओ बिस्कीट भजी वाचूनच अनेकांना विचित्र वाटलं असेल. एखाद्या बिस्किटची भजी कशी काय असू शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एक असं ठिकाण जिथं ही भजी बनते आणि लोक ती खाण्यासाठी येतात, असंही सांगण्यात आलं आहे.
आता ओरिओ भजी कशी बनवतात तर बेसन घ्या, त्यात मीठ आणि बेकिंग पावडर टाकली त्यानंतर त्यात ओरिओ बिस्कीट टाकून आपण एरवी भजी तळतो तशाच भजी तळून घ्यायच्या आहेत.
advertisement
Foodie Incarnate युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही भजी बनवली आहे. व्हिडीओत विक्रेत्याने केलेल्या दाव्यानुसार लहान मुलांना या भजी आवडतात. व्हिडीओत सांगितल्यानुसार या 100 ग्रॅम भजीची किंमत 30 रुपये आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही भजी मिळते असं सांगण्यात आलं आहे.
या विचित्र भजीचा व्हिडीओ बनवणारी व्यक्तीसुद्धा ही भजी खाऊन बघते. खजूरच्या चटणीसोबत ती खाताना दिसत आहे. त्याने सांगितल्यानुसार चवीला ठिक आहेत, फार चांगले नाहीत पण खाण्यायोग्य आहेत.
पण तरी ओरिओची भजी... तुम्ही खाणार का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता अहमदाबादला जाऊन ही भजी टेस्ट करणं शक्य नाही तर घरी एकदा बनवून पाहा आणि कसे झाले आम्हाला नक्की सांगा.
