Landge Recipe Video : गुजराती खांडवीवरही भारी पडतील असे खान्देशी लांडगे, एकदा करून तर पाहा, ही घ्या रेसिपी

Last Updated:

Khandeshi Landge Recipe Video : लांडगे... नाव वाचून विचित्र वाटेल. पण पदार्थ पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. विचित्र नावाची पण चविष्ट ही रेसिपी...

News18
News18
नवी दिल्ली : गुजराती खांडवी तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लीच असेल. असाच खांडवीशी मिळताजुळता एक पदार्थ जो आपल्या महाराष्ट्रात बनतो, तो म्हणजे लांडगे. एक खान्देशी पदार्थ आहे. हा इतका भारी की गुजराती खांडवीही यापुढे फिकी वाटेल. खान्देशी लांडग्यांची रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
लांडगे... नाव वाचून विचित्र वाटेल. पण पदार्थ पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. विचित्र नावाची पण चविष्ट ही रेसिपी... आता आपण बिलकुल वेळ वाया नको घालवूया. यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसं बनवायचं, त्याची कृती पाहुयात.
advertisement
साहित्य
कणिकेसाठी : गव्हाचं पीठ, हळद, मीठ, तेल
सारणासाठी : भिजवलेली मूगडाळ - 1 वाटी, भिजवलेली तूरडाळ - 1 वाटी, भिजवलेली हरभरा डाळ - 1 वाटी, जिरं, लसूण, हिरवी मिरची, आलं, मीठ, कोथिंबीर
फोडणीसाठी : तेल , मोहरी , जिरे, तीळ, कढीपत्ता, कोथिंबीर
कृती
गव्हाच्या पिठात हळद, मीठ आणि थोडं तेल टाकून मिक्स करून घ्या. थोडंथोडं पाणी टाकून पीठ नीट मळून घ्या. पिठाचा मळलेला गोळा 10 मिनिटं झाकूण ठेवा.
advertisement
आता भिजवलेली तूर डाळ मिक्सरमध्ये वाटा. नंतर त्यात मिरची, आलं, लसूण, जिरं टाकून पुन्हा वाटून घ्या. भिजवलेली मूग डाळ आणि चणाडाळही वाटून घ्या. आता सगळं वाटण मिक्स करून त्यात चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून नीट मिक्स करून घ्या.
advertisement
आता मळलेल्या पिठाचे गोळे करून, चपातीसारखे लाटून घ्या. त्यावर डाळीचं मिश्रण लावून घ्या. नंतर रोल करून घ्या. आता हे रोल वाफवून घ्यायचे. थंड झाले की त्याचे काप करून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, जिरं, तीळ, कडीपत्त्याची फोडणी करा. फोडणी चांगली तडतडली की त्याच तयार केलेले लांडगे टाकून परतून घ्या. वरून कोथिंबीर पसरवून घ्या. आता लांडगे खायला तयार.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Landge Recipe Video : गुजराती खांडवीवरही भारी पडतील असे खान्देशी लांडगे, एकदा करून तर पाहा, ही घ्या रेसिपी
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement