कोल्हापूर : कोल्हापुरातील वडापाव म्हटलं की सर्वात मोठा वडापाव हे कोल्हापूरच खास वैशिष्ट्य डोळ्यासमोर येतं. मात्र कोल्हापुरातच नाशिकचा उलटा वडापाव देखील खवय्यांना खायला मिळत आहे. पण जगात भारी कोल्हापूरकर विक्रेत्या महिलेने त्यातही शक्य लढवत आपले वेगळेपण जपले आहे. त्यामुळेच हा उलटा वडापाव टेस्ट करायला नागरीक मोठ्या उत्सुकतेने येत आहेत.
advertisement
कोल्हापुरातील रंकाळा परिसरात संध्यामठ जवळच समर्थ वडपाव सेंटर आहे. गेली जवळपास दोन वर्षे या ठिकाणी वडापाव विक्री करत असतानाच हे सेंटर चालवणाऱ्या संभाजी आणि परिणीता पाटील या पतीपत्नीने नाशिकचा प्रसिद्ध उलटा वडापाव विकायला देखील सुरुवात केली. परिणीता दिवसभर एका खाजगी कंपनीत काम करतात तर त्यांचे पती दिवसभर वडापाव सेंटर साठी लागणारी सर्व तयारी पूर्ण करतात. संध्याकाळी 6 वाजता परिणीता ऑफिसमधून घरी आल्यानंतर नवरा बायको दोघे मिळून हे वडापाव सेंटर चालवतात.
गुलाब जामून बासुंदी कधी ट्राय केलीत का? इथं मिळतेय 15 प्रकारची टेस्ट
काय आहे खासियत
परिणीता यांनी नाशिकचा उलटा वडापाव कसा बनतो हे जाणून घेतले होते मात्र त्याच प्रकारे आपला उलटा वडापाव न बनवता त्यांनी आपली एक वेगळी रेसिपी बनवली. सुरुवातीला ग्राहकांकडून त्याबद्दलच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. त्यामुळेच आज त्यांच्याकडे मिळणाऱ्या कोल्हापुरी मोठा वडापाव, बॉम्बे वडा, दाबेली आणि उलटा वडापाव या खाद्यपदार्थांची चव लोकांना आवडू लागली आहे, अशी माहिती परिणीता यांनी दिली आहे.
कसा बनतो उलटा वडापाव
परिणीता यांच्याकडे बनवल्या जाणाऱ्या उलट्या वडापावची खास पाककृती त्यांनी सांगितली आहे.
1) सुरुवातीला बटाटा उकडून त्यामध्ये थोडे मीठ, तळलेल्या भजीचा चुरा, कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचा खर्डा आदी घटक एकजीव करून घेतले जातात.
2) यामध्ये वापरला जाणारा खर्डा हा वेगळ्या पद्धतीने बनवला असल्याने भाजीला येणाऱ्या चव आणि तिखटपणा यामध्येही वेगळेपणा पाहायला मिळतो. बटाटा व्यवस्थित कुस्करून या भाजीचे लहान लहान गोळे करून घेतले जातात.
3) वड्याचे पीठ तयार करून घेताना बेसन पीठ, मीठ, थोडासा खायचा सोडा, पाणी आणि तेलाचे मोहन मिसळून पाणी घालून थोडे पातळ करून घेतले जाते.
4) दुसरीकडे वडापावचा पाव मधोमध कट करून त्यामध्ये बटाट्याच्या भाजीचा एक गोळा, थोडी बारीक शेव, मसाले शेंगदाणे, कांदा कोथिंबीर आणि घरगुती पद्धतीने बनवलेले 2 सिक्रेट मसाले टाकले जातात. त्यानंतर हा पाव बेसणपिठात बुडवून 2-4 मिनिटे तळला जातो.
गोड जिलेबी आवडत नाही? मग तिखट खा, चहामध्ये बुडवून लागते एकदम भारी!
5) पुढे तळलेला उलटा वडापाव कट करून त्यावर टोमॅटो सॉस, पुदिन्याची हिरवी चटणी, बारीक शेव, घरगुती सिक्रेट मसाला टाकून ग्राहकांना खायला दिला जातो.
मुळात बाहेरच्या जिल्ह्यातला पदार्थ असून कोल्हापुरात चवीला उत्तम आणि पोटभर असा हा नाष्टा मिळत आहे. उलटा उलटा वडापावची किंमत 15 रुपये आहे. त्यात फक्त सायंकाळी 06 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या वडापाव सेंटरवर हा नवीन पदार्थ टेस्ट करण्यासाठी ग्राहक संध्याकाळच्या वेळेला गर्दी करत आहेत.
कोल्हापुरी चटणीमुळंच असतो जेवणाला स्वाद, पण हे तिखट बनवण्यासाठी मिरची कोणती घ्यावी?
वेळ : सायंकाळ 6 ते रात्री 10
पत्ता : समर्थ बाँबे वडा सेंटर, संध्यामठ जवळ, रंकाळा चौपाटी, शिवाजी पेठ, कोल्हापूर - 416012.