इथलं सर्वात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे खिचिया पापड. हा पापड मक्यापासून आणि तांदळापासून बनवला जातो. फक्त 40 रुपयांत मिळणारा हा पापड चव आणि कुरकुरीतपणाचा सुंदर संगम आहे. गरमागरम खिचिया पापडावर बारीक चिरलेली काकडी, कोबी, टोमॅटो आणि कैरी घालून त्यावर गोड आणि तिखट चटण्या ओतल्या जातात. शेवटी वरून टाकलेली बारीक शेव या पापडाला आकर्षक आणि स्वादिष्ट बनवते.
advertisement
Cheap Food Nashik: अस्सल घरगुती जेवण, फक्त 35 रुपयांत, नाशिकमधील हे ठिकाण माहितीये का?
खिचिया पापडचा रंग, सुगंध आणि तिखट-गोड मिश्र चव खवय्यांच्या जिभेवर चटकन बसते. अनेक वर्षांपासून या ठिकाणी येणारे ग्राहक सांगतात की, भुलेश्वरला गेलो आणि रमेश मिश्रा यांचा खिचिया पापड खाल्ला नाही, तर ट्रिप अपुरीच राहते. काहीजण तर खास या पापडसाठी दूरवरून येतात.
दुपारी आणि संध्याकाळी या स्टॉलसमोर नेहमीच गर्दी असते. ऑफिसहून परतणारे, शॉपिंगसाठी आलेले किंवा फक्त काहीतरी हलकं पण चविष्ट खाण्याच्या मूडमध्ये असलेले लोक सगळ्यांसाठी रमेश मिश्रा फास्ट फूड सेंटर एक आवडतं ठिकाण बनलं आहे.
भुलेश्वर म्हटलं की शॉपिंगची आठवण येतेच, पण आता खाद्यप्रेमींना इथल्या खिचिया पापडाची चव ही भुलेश्वरची खास ओळख बनली आहे. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर चवीचा हा अनुभव नक्कीच प्रत्येकाने एकदा घ्यावा.





