तसं तुम्ही इंटरनेटवर सर्च कराल तर तुम्हाला बरेच मराठी उखाणे मिळतील. पण गौरीनिमित्त उखाणे कमीच आहेत. अगदी मोजून तुम्हाला काही उखाणे दिसतील आणि बहुतेक महिला तेचतेच उखाणे घेतील. पण आम्ही तुमच्यासाठी आता नवीन उखाणे घेऊन आलो आहोत. असे उखाणे जे क्वचितच कुणी घेतले असतील. त्यामुळे तुमच्या लग्नाला कितीही वर्षे झाली असोत वा तुम्ही नवीन नवरी असो. हे उखाणे घेतलात तर सगळे तुमची वाहवाह करतील. सगळेच इम्प्रेस होतील.
advertisement
गौरीगणपतीसाठी मराठी उखाणे
गणपती बाप्पा, सर्वांच्या पूर्ण कर ईच्छा,
_________ रावांचे नाव घेते, सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
-----------------------------------------------------------------
पंचपक्वान, झिम्मा फुगडी, पूजा आरतीची घाई,
_________ रावांचे नाव घेते, सुखी ठेव आम्हा गौराई.
------------------------------------------------------------------
गणपतीला आवडतं जास्वंदीचं लाल फूल
_________ राव दिसतात माझे खूपच कुल
------------------------------------------------------------------
गौरी गणपतीसाठी कोकणात जाताना, लागतात फार रांगा,
बाप्पा ____________ रावांना सुट्टी देत नाही त्यांचा बॉस, जरा त्यांना सांगा.
------------------------------------------------------------------
भाद्रपद महिन्यात वाजतगाजत येतात गौरी गणपती
_________रावांचे घेते, ते आहेत माझे प्रेमळ पती
------------------------------------------------------------------
गौराई पूजनासाठी हिरवी पैठणी नेसले
_________रावांना पाहून गालात गोड हसले
------------------------------------------------------------------
हर्ष आनंद घेऊन घरी आल्या गौरी-गणपती
_________राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती
-----------------------------------------------------------------
नाही मला द्वेष, मत्सर, नाही हेवा
_________रावांचे नाव घेते_________ सून
सगळ्यांनी लक्ष ठेवा
------------------------------------------------------------------
Ganpati Bappa Morya: ‘गणपती बाप्पा मोरया’ असं का म्हणतात? तुम्हाला माहितीये का हे कारण?
गौराईची भरते खणानारळाने ओटी
_________रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी
पंचामृताचा तीर्थ साखरेची खडी
प्रसादासाठी गूळ शेंगदाण्याची वडी
फुलांचा हार दुर्व्याची जुडी
नैवेद्यासाठी बनवली खीर आणि कडी
श्रीगणेशाच्या आगमनासाठी मखमली घडी
गौरीला नेसायला पैठणी साडी
तांदळाची रास खोबऱ्याची वाटी
चांदीचा पाट गौरी गणपतीसाठी
हिरवा चुडा खणानारळाची ओटी
....रावांचं नाव ऐकायला सर्वांनी केली दाटी
------------------------------------------------------------------
आडमाड रामफळाचं झाड
रामफळाच्या झाडावर होता पक्ष्याचा थवा
थव्यात होता एक पोपट
पोपटाच्या चोचीत होता मोती
मोती पडला तळ्यात
तळ्याच्या काठी होता भलामोठा वाडा
वाड्यासमोर होते प्रांगण
प्रांगणात होते तुळशीचे वृंदावन
तुळशीच्या वृंदावनात होते तुळशीचे झाड
तुळशीच्या झाडाला घालते पाणी
पाण्याला घेतली कळशी
कळशी घेऊन गेली नदीकाठी
नदीच्या काठी होते शंकराचे मंदिर
शंकराचे मंदिरात करते.... रावांसाठी नवस
आज आहे गौरीपूजनाच दिवस