Ganpati Bappa Morya: ‘गणपती बाप्पा मोरया’ असं का म्हणतात? तुम्हाला माहितीये का हे कारण?

Last Updated:

Ganpati Bappa Morya: गणपती बाप्पाचा जयघोष गणपती बाप्पा ‘मोरया’ असाच केला जातो. यामागे एक खास करून असून याबाबत अनेकांना माहिती नसेल.

+
Ganpati

Ganpati Bappa Morya: ‘गणपती बाप्पा मोरया’ असं का म्हणतात? तुम्हाला माहितीये का हे कारण?

‎छत्रपती संभाजीनगर : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. आपल्याकडे कुठलंही शुभ कार्य सुरू करण्याअगोदर गणपती बाप्पाचंच नाव घेऊन प्रारंभ केला जातो. तसंच बाप्पाची आरती झाल्यानंतर आपण सर्वजण ‘गणपती बाप्पा मोरया’ असं देखील म्हणतो. पण आपण ‘गणपती बाप्पा मोरया’ असंच का म्हटलं जातं? हे अनेकांना माहिती नसेल. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील श्रीराम धानोरकर गुरुजी यांनी माहिती दिलीये.
आख्यायिका काय?
‎महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिंचवड या भागातील ही कथा आहे. या गावामध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक निस्सीम भक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून दूर 95 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. पुढे ते याच ठिकाणी स्थायिक झाले. सतत 42 दिवस तप करून त्यांनी गणपती बाप्पाला प्रसन्न केले होते.
advertisement
धानोरकर सांगतात की, “मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असे सांगितले जाते की, वयाच्या तब्बल 117 व्या वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु, पुढे वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हते. आपल्याला देवाचे दर्शन होत नाही या विचाराने मोरया गोसावी नेहमी दुःखी राहू लागले. मग, बाप्पाला तरी आपल्या भक्ताचं दुःख कसं बरं पाहवेल? मग, एके दिवशी गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन.”
advertisement
‎दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना, त्यांच्या ओंजळीमध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. गणपती बाप्पाने स्वतः त्यांना दर्शन दिले होते. पुढे हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. काही काळानंतर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली. ही समाधी देखील या मंदिराजवळच आहे. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते, असे धानोरकर सांगतात.
advertisement
बाप्पाचे निस्सीम भक्त म्हणून मोरया गोसावी यांचे नाव गणेशाशी अशाप्रकारे जोडले गेले आहे की, लोक फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया नक्कीच म्हणतात. पुण्यातील याच गावापासून ‘गणपती बाप्पा मोरया’ बोलण्यास सुरुवात झाली आणि पुढे देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाऊ लागले.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganpati Bappa Morya: ‘गणपती बाप्पा मोरया’ असं का म्हणतात? तुम्हाला माहितीये का हे कारण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement