TRENDING:

Ghee vs. Butter : तूप की बटर, तुमच्या आरोग्यासाठी काय चांगलं?

Last Updated:

Ghee vs. Butter Difference : तूप आणि बटर.  दोन्हीही दुधापासून बनणारे पदार्थ तरीही हे दोन्हीही वेगळे आहेत. या दोन्हीमधले काही फरक आणि साधर्म्य सांगणार आहोत. यानंतर तुमच्यासाठी या दोन्हींपैकी काय योग्य आहे? हे ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आपल्या आहारात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. मात्र त्याचबरोबर त्या पदार्थाला एखादा पर्याय निर्माण झाला की, आपला गोंधळ उडतो. असेच नेहमी गोंधळात टाकणारे दोन पदार्थ म्हणजे तूप आणि बटर.  दोन्हीही दुधापासून बनणारे पदार्थ तरीही हे दोन्हीही वेगळे आहेत. या दोन्हीमधले काही फरक आणि साधर्म्य सांगणार आहोत. यानंतर तुमच्यासाठी या दोन्हींपैकी काय योग्य आहे? हे ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.
News18
News18
advertisement

तूप आणि लोण्याची चव खूप वेगळी असते. म्हणूनच ते खूप वेगळ्या प्रकारे वापरले जातात. भारतात, सर्व प्रकारच्या करी, डाळ आणि मांसाचे पदार्थ शिजवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. विशेष प्रसंगी पुरी आणि पराठे तळण्यासाठी, रव्याचा शिरा आणि गाजराचा हलवा बनवण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. कारण, उच्च तापमानातही तुपात पदार्थ शिजवता येतात.

advertisement

Brown Rice Vs White Rice : ब्राऊन राइस की व्हाइट राइस, कोणत्या तांदळाचा भात आरोग्यासाठी चांगला?

लोण्याचा वापर व्हाईट सॉस किंवा बेचेमेल सारखे इन्स्टंट सॉस बनवण्यासाठी केला जातो. भाजीपाला विशेषत: मासे, कोळंबी आणि खेकडे यांसारखे झटपट शिजणारे पदार्थ बनवताना लोणी हा एक उत्तम पर्याय आहे. लोण्यामुळे मांसाला चांगली चव येते. लसूण व इतर सिझनिंगमध्ये लोणी मिसळल्यानंतर चव आणखी चांगली होते.

advertisement

तूप आणि बटरमधील घटक

तूप आणि बटर हे दोन्हीही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स, रिबोफ्लेविन, फॉस्फरस आणि कॅल्शियमने समृद्ध असतात. त्यामुळे यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.

तूप आणि लोण्याची तुलना केल्यास दोन्हींमध्ये भरपूर पोषक घटक असतात. तुपामध्ये हेल्दी फॅट्ससह व्हिटॅमिन ए, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्सही असतात. फोर्टिफाइड लोण्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं. प्रति 100 ग्रॅम लोण्यामध्ये 71 टक्के हेल्दी फॅट्स, 3 ग्रॅम अनहेल्दी फॅट्स आणि 717 किलोकॅलरी असतात. 100 ग्रॅम तुपामध्ये 60 टक्के हेल्दी फॅट्स आणि 900 किलो कॅलरी असतात. तुपात अनहेल्दी फॅट्स नसतात.

advertisement

तूप आणि बटरचे फायदे

तुपामध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण बटरपेक्षा थोडे जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांसाठी तुपापेक्षा बटर चांगला पर्याय ठरू शकतो. प्रोटीनचे प्रमाण तुपामध्ये बटरपेक्षा जास्त असते. त्यामुळे ज्या लोकांना प्रोटीनची जास्त आवश्यकता आहे त्यांनी तुपाचीच निवड करावी.

बटर तुमची डोळे निरोगी ठेवण्यात मदत करते. त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर आणि पोटाच्या कॅन्सरपासूनही तुमचा बचाव करते. तुपदेखील कॅन्सरसोबत लढण्यात मदत करते आणि त्याचबरोबर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवरदेखील हे उपयुक्त आहे.

advertisement

Fitness and Exercise : घरातच बनवा स्वतःची जीम, फार काही नाही फक्त ही 5 उपकरणं लागतील

तुपाप्रमाणे लोणी देखील आरोग्यासाठी चांगलं असतं. पण, ते साधं लोणी म्हणजे ज्यात मीठ नसतं ते पांढरं लोणी असलं पाहिजे. पांढरं लोणी घरगुती दुधापासून तयार केलं जातं.  मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या लोण्यावर प्रक्रिया करून त्यात मीठ मिसळलेलं असतं. जेणेकरून ते बराच काळ टिकेल. हे लोणी आरोग्यासाठी चांगलं नसतं. दुकानातून तूप खरेदी करतानाही लेबल नीट वाचलं पाहिजे. कारण, जर त्यात 'वनस्पती तूप' असा उल्लेख असेल तर ते पारंपरिक तूप नसतं. त्यात अनहेल्दी फॅट्स असण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ghee vs. Butter : तूप की बटर, तुमच्या आरोग्यासाठी काय चांगलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल