काही लोकांना थोड्याशा दारूनेही नशा चढते. मग दुसऱ्या दिवशी त्याचा नकारात्मक प्रभाव, ज्याला आपण हँगओव्हर म्हणतो. त्याचा त्रास सुरु होतो. यामुळे दुसऱ्या दिवशी कोणतेही काम करणे अवघड होऊन जाते. म्हणून आज आम्ही तुम्हाला हँगओव्हर कोणत्या कारणांमुळे होतो आणि त्यावर प्रभावी असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
हँगओव्हरची कारणे
रिकाम्या पोटी दारू पिणे हे हँगओव्हरचे सर्वात महत्त्वाचे कर आहे. कारण यामुळे दारू लवकर परिणाम करते.
advertisement
कमी पाणी पिणेही एक कारण असते. दारूमुळे डिहायड्रेशन वेगाने होते आणि ते टाळण्यासाठी पाणी पिणे आवश्यक असते.
जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने शरीराची पचन प्रक्रियाही बिघडते ज्यामुळे निश्चितच हँगओव्हर होतो.
हँगओव्हर घालवण्यासाठी काही सोपे उपाय
लिंबू पाणी किंवा नारळ पाणी : लिंबू आणि थोडे मध घालून थंड पाणी प्या. यामुळे शरीरातील साखरेची पातळी संतुलित होते आणि नशा कमी होण्यास मदत होते. नारळ पाणी प्या. कारण नारळ पाणी हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट पेय आहे. याने त्वरित आराम मिळवण्यासाठी ते जास्त प्या.
पुदिन्याचा चहा : पुदिन्याची पाने उकळून प्यायल्याने गॅस, उलट्या आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो. त्याचबरोबर तुम्ही थोडे काळे मीठ आणि आल्याचा तुकडा खाऊ शकता हे खाल्ल्याने मळमळ आणि उलट्या थांबतात.
टोमॅटोचा रस आणि फळं : टोमॅटोमधील फ्रुक्टोज अल्कोहोल तोडतो आणि शरीराला ताजेतवाने करतो. हे तुमचा हँगओव्हर लवकर घालवण्यात मदत करते. त्याचबरोबर केळी आणि सफरचंदही खा. या फळांमधील पोटॅशियम आणि फायबर ऊर्जा प्रदान करतात आणि पोट शांत करतात.
मध : मधातील नैसर्गिक साखर अल्कोहोलचे हानिकारक परिणाम कमी करते. त्यामुळे हँगओव्हर घालवण्यासाठी तुम्ही थोडासा मधही खाऊ शकता. त्याचबरोबर पुरेशी झोप घ्या, हलके आणि पौष्टिक अन्न खा, थंड आंघोळ करा आणि आरामदायी संगीत ऐका. यानेही तुम्हाला आराम मिळेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
