Success Story : परंपरेचा जपला वारसा, उच्च शिक्षित तरुणाचा कोल्हापुरी चप्पल व्यवसाय, महिन्याला 1 कमाई Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
उच्च शिक्षित असूनही पारंपरिक व्यवसायाला नवा चेहरा देण्याचा निर्णय घेतलेल्या मंजुनाथने आज कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला चांगल्या उंचीवर नेले आहे.
पुणे : आवड असेल आणि करण्याची जिद्द असेल तर कोणतेही क्षेत्र छोटे नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुळशीबाग मार्केट परिसरातील अस्सल कोल्हापुरी पायताण या दुकानाचा तरुण उद्योजक मंजुनाथ भिसुरे. उच्च शिक्षित असूनही पारंपरिक व्यवसायाला नवा चेहरा देण्याचा निर्णय घेतलेल्या मंजुनाथने आज कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला चांगल्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या दुकानातील विविधता, गुणवत्ता आणि परंपरेचा वारसा यामुळे दररोज मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होत आहेत.
भिसुरे कुटुंबाचा हा व्यवसाय गावाकडे 25 वर्षे सुरू होता. त्यानंतर पुण्यातील जोगेश्वरी लेन भागात मागील 20 वर्षांपासून व्यवसाय सुरू आहे. तीन पिढ्यांपासून चालत आलेल्या या उद्योगाला मंजुनाथने आधुनिक बाजारपेठेची जाण, ग्राहकांचे निरीक्षण आणि नव्या डिझाइन्सची जोड देत अधिक विस्तार दिला. आज या दुकानात लेडीज, जेन्टस तसेच लहान मुलांसाठीही विविध प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल, मोजड्या आणि पारंपरिक पायताणांची विक्री केली जाते.
advertisement
दुकानात 200 पेक्षा जास्त प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध आहेत. वेणी पंच, रिंग गोंडा, पुनाशेप, अंगठा पट्टी अशा विविध प्रकारांपासून ते आधुनिक फ्यूजन डिझाइन्सपर्यंत सर्व काही येथे मिळते. काही प्रमाणात मशीनचा तर जास्त प्रमाणात पारंपरिक हातकामाचा स्पर्श आणि टिकाऊपणा हा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, सर्व उत्पादनांमध्ये मूळ कोल्हापुरी कारागिरांचे कौशल्य आणि दर्जेदार चामडे यांचा वापर केला जातो.
advertisement
येथील चप्पलांची किंमत 500 रुपयांपासून सुरू होते. भरपूर पर्याय आणि टिकाऊ गुणवत्ता यामुळे या दुकानाला स्थानिक ग्राहकांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. नव्या पिढीच्या कल्पकतेसह पारंपरिक व्यवसायाचा मिलाफ केल्यास यशाचे दार सहज उघडते, हे मंजुनाथने सिद्ध केले आहे.
तुळशीबागेतील मोठ्या ग्राहकवर्गाच्या मागणीमुळे आणि सातत्याने मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांच्या दुकानाला महिन्याला सुमारे एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. पुण्यातील तरुण उद्योजकांसाठी हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. मंजुनाथ भिसुरे यांसारखे तरुण जेव्हा परंपरेला आधुनिक बाजारपेठेशी जोडतात तेव्हा असे उद्योग आजही चांगल्या प्रकारे चालू शकतात, हे स्पष्ट होते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 4:34 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : परंपरेचा जपला वारसा, उच्च शिक्षित तरुणाचा कोल्हापुरी चप्पल व्यवसाय, महिन्याला 1 कमाई Video

