हिरव्या मटारपासून उसळ, भाजी, पराठे, सूप असे अनेक पदार्थ बनवता येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एक भन्नाटर रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे मटारचे ढोकळा. मटार ढोकळा हा एक हलका, पचायला सोपा आणि आरोग्यदायी नाश्ता किंवा संध्याकाळचा पदार्थ आहे. रवा आणि मटार यांचे मिश्रण असल्यामुळे हा ढोकळा चवीसोबतच पोषणही देतो. चला तर मग पाहूया हिवाळ्यासाठी परफेक्ट असलेल्या मटार ढोकळ्याची सोपी रेसिपी.
advertisement
मटार ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
रवा
दही
पाणी
हिरवे मटार
हिरवी मिरची
आलं
मीठ
तेल
इनो
मटार ढोकळा बनवण्याची पद्धत
- सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या नंतर त्यामध्ये दही आणि पाणी मिसळा. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्या. हे मिश्रण सेट होण्यासाठी आणि राव व्यवस्थित फुलण्यासाठी थोडा वेळ झाकून बाजूला ठेवा.
- दुसरीकडे एका मिक्सरच्या भांडयात मटार, मिरची आणि आलं टाकून बारीक पेस्ट बनवून घ्या.
- आता तयार मटारची पेस्ट राव आणि दह्याच्या मिश्रणात घाला. नंतर त्यामध्ये चापुरते मीठ, इनो घाला. इनो सक्रिय करण्यासाठी त्यावर थोडे पाणी घाला आणि हलक्या हाताने हे सर्व एकत्र करून घ्या.
- आता तुमचे ढोकळ्याचे बॅटर तयार आहे. हे मिश्रण आता आपल्याला वाफवायचे आहे. त्यासाठी एका गॅसवर ढोकळ्याचे भांडे ठेवा आणि त्यात थोडे पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या.
- आता ढोकळ्याचे बॅटर ढोकळ्याच्या प्लेटमध्ये टाका आणि बटरमधील हवेचे बुडबुडे म्हणजेच एअर बबल घालवण्यासाठी प्लेट हलक्या हाताने ओट्यावर आदळा.
- आता ही प्लेट ढोकळ्याच्या भांड्यात ठेऊन त्याला झाकण लावून घ्या आणि ढोकळा वाफवून घ्या. ढोकळा तयार झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यामध्ये चाकू घालून पहा. चाकूला मिश्रण चिकटले नाही तर त्याचा अर्थ ढोकळा तयार आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
