रमेश मोरे यांनी 35 वर्ष एसटी महामंडळात काम केल्यानंतर 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर कल्पना सुचली की, पर्यावरण जपण्यासाठी काही झाडांची लागवड करावी आणि त्या संकल्पनेतून सीताफळ, साग, मोहगुणी आणि चंदन झाडांची लागवड केली. चंदन आणि सीताफळ झाडांची लागवड दहा बाय वीस वर करण्यात आली, तर मोहगुणी दहा बाय दहाच्या अंतरावर लागवड केली आहे. या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन केले आहे. चंदन झाडांना विशेषतः फवारणी, खत लागत नाही, तसेच कुठलेही रोग या झाडांवर येत नाहीत. होस्ट मात्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे चंदन झाडाच्या बाजूला मोहगुणी आणि सीताफळाचं होस्ट त्याला मिळतं, असे रमेश मोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
Success Story : 15 वर्षांपूर्वी लावलं डोक, शेतकरी करतोय आता फायद्याची शेती, वर्षाला लाखांत कमाई
चंदन शेती करावी का?
इतर शेतकऱ्यांनी देखील चंदन शेती करायला पाहिजे, प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा आणि आवड असते, कोणत्या पिकात जास्त उत्पन्न आहे. अनेक जणांना कमी वेळात उत्पन्न पाहिजे असते, चंदन शेतीचे उत्पादन काढण्यापुरता म्हणजे 10 ते बारा वर्ष कालावधी ज्या शेतकऱ्यांची उत्पन्नाला थांबायची क्षमता आहे त्यांनी ही शेती करावी.
तब्बल दहा ते बारा वर्षांनी उत्पन्न
चंदन झाडे दहा ते बारा वर्षांनी तयार होतात त्यानंतर त्यामध्ये गाभा असतो. चंदनाचा गाभा दहा काय पंधरा वर्ष जरी ठेवला तरी तो दिवसेंदिवस वाढत जातो आणि त्याबरोबरच उत्पन्न देखील वाढते. एका झाडांमधून अंदाजे 15 ते 20 किलो चंदनाचा गाभा मिळत असतो त्यामुळे एकूण सांगता येणार नाही मात्र जे मिळेल ते समाधानकारक मिळेल अशी अपेक्षा आहे, असे देखील मोरे यांनी म्हटले आहे.
चंदन झाडांचे संरक्षण कसे?
रमेश मोरे हे स्वतः शेतात राहत असल्यामुळे चंदन झाडांचे संरक्षण देखील ते स्वतः करतात. तसेच येणाऱ्या काळात तारेची संरक्षण भिंत देखील बनवायची आहे. विशेष म्हणजे सातबाऱ्यावर याची नोंद केलेली आहे.





